आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांच्‍या विधानाने सभागृहात हास्यकल्लोळ, म्‍हणाले-:‘मी पवारांच्या तालमीत तयार झालो’, या वाक्याची  भीती वाटते

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘मी पवारांच्या तालमीत तयार झालो,’ असे विधान केले. त्यावर ‘मला अशा वाक्याची भीती वाटते, कारण ‘मी पवारांचे बोट धरून राजकारणात आलो, असेही कुणीतरी म्हणालं होतं,’ असे पवारांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. जागतिक मराठी संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनेक किस्से आणि आठवणींची मैफल जमवली. मराठी माणूस जगभरातील अनेक देशांत आहे. त्यांचे कर्तृत्व आजच्या पिढीला समजावे आणि प्रेरणा मिळावी, या उद्देशाने जागतिक मराठी अकादमीची स्थापना केली, असे सांगून पवार म्हणाले, ‘शिंदे यांनी ते माझ्या तालमीत तयार झाले’, असा उल्लेख करताच मी घाबरलो. कारण कुणीतरी ‘माझे बोट धरून राजकारणात आलो, ‘ असेही म्हटले होते. पवार यांचे हे वाक्य ऐकताच त्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख जाणून सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

डाॅ. मोहन आगाशे यांच्या सत्काराचा उल्लेख करताना पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा घाशीराम कोतवाल नाटकाला कसा विरोध होता, हा किस्सा ऐकवला. नाटकातील कलाकारांना विमान गाठण्यासाठी मुंबईत जाता येऊ नये म्हणून महामार्गावर अडवण्याची व्यवस्था ठाकरे यांनी केली होती. प्रत्यक्षात किर्लोस्करांना विनंती करून मी आयत्या वेळी खासगी विमानाने मुंबईत पोहाेचवले आणि नाटक जर्मनीत जाऊ शकले, अशी आठवण पवारांनी सांगितली.

बातम्या आणखी आहेत...