आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकींचा निकाल आज लागला आहे. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने आघाडी आहे. मात्र एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच दणका बसला आहे. राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश घुलेंचा 14 मतांनी पराभव केला आहे.
जिल्हा बँकेच्या कार्यकिर्दीत प्रथमच विरोधी उमेदवाराने राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करत पुणे जिल्हा बँकेत प्रवेश करुन इतिहास घडवला आहे. महत्त्वाचे म्हणजे या जागेविषयी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभेत प्रदीप कंद यांना जागा दाखवून देणार असल्याचे म्हटले होते. मात्र मतदारांनी प्रदिप कंद यांना दणदणीत मतांनी विजयी केले आहे.
पुणे जिल्हा बँकेच्या 14 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर उर्वरीत 7 जागांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक लक्ष्य लागून राहिलेल्या 'क' सहकारी बँका व पतसंस्था गटाकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान आज मंगळवारी अल्पबचत भवानात मतमोजणीत पार पडली. यामध्ये भाजपचे उमेदवार प्रदिप कंद 405 तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश घुले यांना 391 मते मिळाली आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.