आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी:व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी ' पेरा ' सीईटी तारीख जाहीर

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्य़ा विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या विनंतीनुसार ‘पेरा' (प्रीमिनन्ट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन), या महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठांच्या संघटनेच्या पेरा सीईटी सेलतर्फे 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी दुसऱ्यांदा सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही सीईटी परीक्षा 30 जून आणि 1 व 2 जुलै 2022 दरम्यान ऑनलाईन प्रॉक्टर्डद्वारे घेतली जाणार आहे. या सीईटी परीक्षेसाठी 26 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

या तारखेला लागणार निकाल

या परीक्षेचा निकाल 9 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती पेरा इंडियाचे अध्यक्ष व एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, पेराचे उपाध्यक्ष भरत अग्रवाल आणि पेराचे सीईओ प्रा. हनुमंत पवार यांनी गुरुवारी दिली आहे.

या विषयाची सीईटी

डॉ. मंगेश कराड म्हणाले, पेरा ही खासगी विद्यापीठांची संघटना देशभरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंजीनियरिंग, बायोइंजीनियरिंग, डिझाइन, फाईन आर्टस्, फुड टेक्नॉलॉजी, फार्मसी, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर, लॉ आणि अग्री इंजीनियरिंग या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पेरा सीईटी महत्वाची आहे.

संकेतस्थळाला द्या भेट

या सीईटीच्या गुणांवर विद्यार्थ्यांना राज्यातील 15 खासगी विद्यापीठांमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.peraindia.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन कराड यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...