आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:‘पेरा - सीईटी’ पूर्वपरीक्षेच्या अर्जाला12 जुलैपर्यंत मुदतवाढ, 16, 17 आणि 18 जुलैदरम्यान ऑनलाइन हाेणार

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पालक आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ‘पेरा इंडिया’ (प्रीमिनंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन) या राज्यातील १४ खासगी विद्यापीठांच्या संघटनेने २०२१-२२ या सत्राच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी (पेरा सीईटी-२०२१) अर्ज भरण्यास १२ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही पूर्व परीक्षा १६, १७ आणि १८ जुलैदरम्यान ऑनलाइन माध्यमांद्वारे होणार आहे, अशी माहिती ‘पेरा’चे अध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांनी दिली.

डॉ. कराड म्हणाले, खासगी विद्यापीठांतील इंजिनिअरिंग, बायो इंजिनिअरिंग, मरीन इंजिनिअरिंग, डिझाइन, फाइन आर्ट््स, फूड टेक्नॉलॉजी, फार्मसी, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर, लॉ आणि हॉटेल व्यवस्थापन या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ही सीईटी घेण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.peraindia.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. या सीईटीद्वारे विद्यार्थ्यांना एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे, विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे, सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी- पुणे, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी- पुणे, स्पायसर अ‍ॅडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी- पुणे, संदीप विद्यापीठ- नाशिक, संजय घोडावत विद्यापीठ- कोल्हापूर, एमजीएम विद्यापीठ-औरंगाबाद, एमआयटी डब्ल्यूपीयू युनिव्हर्सिटी- पुणे, डी. वाय. पाटील विद्यापीठ, अँबी -पुणे, विजयभूमी युनिव्हर्सिटी-मुंबई, सोमय्या विद्यापीठ-मुंबई, डीवाय पाटील अॅग्रीकल्चर आणि टेक्निकल विद्यापीठ-कोल्हापूर येथे प्रवेश घेता येईल.

बातम्या आणखी आहेत...