आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कास पठार उद्ध्वस्त करण्याचे षड‌्यंत्र:राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणात याचिका दाखल, अॅड. असिम सरोदेंची माहिती

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘कास पठार’ येथे बेकायदेशीर अतिक्रमणाने वेढलेले असून, अतिक्रमणांमुळे संबंधित भागातील पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. मात्र, परिसरातील बेकायदेशीर १५५ बांधकामे कायदेशीर करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाट घालून कास पठार उद्ध्वस्त करण्याचे षड‌्यंत्र रचले जात आहे. या भागातील पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी पुण्यातील राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती ॲड. असीम सरोदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

ॲड. सरोदे म्हणाले की, युनेस्कोतर्फे सन २०२२ मध्ये ‘कास पठार’ जागतिक हेरिटेज स्थळ म्हणून घोषित केले आहे. या भागात ८५० फुलांचे प्रकार असून त्यात ३९ दुर्मिळ प्रकाराची फुले आहेत.

मुख्यमंत्र्यांवर दबाव याचिकाकर्ते सुशांत मोरे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कास पठार परिसरातील १५५ बेकायदेशीर बांधकामे अधिकृत करणार असल्याचे म्हटले. संबंधित बेकायदेशीर बांधकामे कोणत्या नियमांनुसार अधिकृत करणार आहेत, याबाबतचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा. त्यांच्यावर दबाव आहे का, हे स्पष्ट करावे.