आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावैद्यकीय पेशात तपासण्यांचा वाढता वापर होत असला तरी या तपासण्यांचा योग्य तो वापर करून, रुग्नांशी असलेला सुंसंवाद न सोडता डॉक्टरांनी उपचार करावेत असे मत पदमश्री डॉ. रणदीप गुलेरिया यांनी भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांशी बोलताना केले.
वैद्यकीय महाविद्यालयात दोन दिवसीय संशोधन समितीची परिषद सुरु असून या परिषदेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, प्राचार्य डॉ. मंदार करमरकर, वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी, माजी कुलगुरू डॉ. एस.एफ. पाटील हे उपस्थित होते.
डॉ. गुलेरिया पुढे म्हणाले, वैद्यकीय व्यवसाय ही एक कला म्हणून जोपासावी त्यामुळे रुग्नांशी असलेला संवाद अधिक दृढ होईल. डॉ. सावजी म्हणाले, कोविड नंतर प्रथमतःच अशा प्रकारची परिषद होत आहे ही चांगली बाब असून त्यामुळे आपले संशोधन मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत आहे.
या परिषदेसाठी 700 डॉक्टर उपस्थित आहेत. दोन दिवस चालणारऱ्या या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता, क्षयरोग निर्मूलन, सांधेरोपण शस्त्रक्रियेतील रोबोटचा वापर, आरोग्यदायी जीवनशैली या विषयावर विविध तज्ञानी मार्गदर्शन केले. वैद्यकीय विषयातील सुमारे 130 शोधनिबंधाचे वाचन करण्यात आले व त्यातील उत्कृष्ट शोधनिबंधास पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, प्र. कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, आरोग्य विज्ञान विभागाच्या संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांचे मार्गदर्शन लाभले तर डॉ. अनुराधा राजीव जोशी, डॉ. गुरुराज जोशी, डॉ. रवी राऊतजी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.