आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:गाडी अडवल्यामुळे दुचाकीस्वाराने पोलिसाला फरफटत नेले, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद; पिंपरी चिंचवडमधील घटना

पिंपरी चिंचवड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका दुचाकीस्वाराला रोखणे वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला महागात पडले आहे.

पुण्यात पोलिसांकडून अनेक ठिकाणी नाकाबंदी केली जात असून नियमांचं पालन न करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. मात्र हीच कारवाई पोलिसांच्या जीवावर उठली आहे. पिंपरी चिंचवड शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दुचाकीस्वाराला रोखणे वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला महागात पडले आहे.

दुचाकीस्वाराने वाहतूक विभागाच्या पोलिस कर्मचाऱ्याला रस्त्यावरून फरफटत नेल्याची घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीये. संजय एकनाथ शेडगे (वय 42, रा. आढाले खुर्द, ता. मावळ), असे अटक केलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. शंकर तुकाराम इंगळे (वय ४७), असे दुखापत झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एका नाकाबंदी पॉईंटवर हिंजवडी वाहतूक विभागाचे हवालदार शंकर इंगळे ड्युटीवर होते. यावेळी संजय शेडगे नावाचा व्यक्ती समोरून आला. पोलिस हवालदार इंगळे यांनी त्याला थांबवून त्याच्याकडे लायसन आणि इतर कागदपत्रांची विचारणा केली. यावेळी लायसन आणि कागदपत्रे दाखवण्याऐवजी आरोपी शेडगे यानं इंगळे यांच्यासोबत हुज्जत घालायला सुरुवात केली. इंगळे यांना धक्का देऊन दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाल्यानंतर सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...