आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणी:पिंपरीचे भाजप आमदार महेश लांडगेंना मागितली 30 लाख रुपयांची खंडणी

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना जिवे मारण्याची धमकी देऊन ३० लाख रुपये खंडणीची मागणी केल्याचे बुधवारी उघडकीस आले. लांडगे यांच्या परिवर्तन हेल्पलाईनवर खंडणीचा मेसेज आला आहे. खंडणीची रक्कम न दिल्यास आमदार महेश लांडगेंना जीवे मारण्याची धमकी दिली.

यश पवार यांनी यासंदर्भात भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केल्याचे सांगण्यात आले आहे.

माजी मंत्री रमेश बागवेंच्या मागितले ३० लाख रुपये : माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना अज्ञाताने फोनवर गोळ्या घालून ठार करण्याची धमकी देत ३० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत अविनाश रमेश बागवे यांनी खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार ४ एप्रिल रोजी दुपारी तीन ते सायंकाळी पावणेसात वाजण्यादरम्यान घडला. “पिस्तुलातून गोळ्या घालून तुला ठार मारू आणि निवडणुकीत उभे राहायचे नाही,’ अशी धमकी देत ३० लाख रुपये खंडणीची मागणी आरोपीने केली. दरम्यान, भाजपचे माजी नगरसेवक गणेश बीडकर यांनाही खंडणी मागितली होती.

माजी नगरसेवकाच्या भावाला मागितली २० लाख मोक्काच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या माजी नगरसेवकाचा विरोधातील उच्च न्यायालयातील बेल रद्द करण्यासाठी पोलिस अधिकारी बोलत असल्याची बतावणी करून नगरसेवकाच्या भावाकडे २० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारक आरोपीविरोधात लष्कर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.