आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाऊन असताना गॅंग वॉरचा भडका, 24 तासांच्या आत खूनाचा बदला घेण्याचा प्रयत्न

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या हल्ल्यामध्ये भरत दिलीप लोंढे हा गंभीर जखमी झाला आहे.

वाढत्या कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती ही गंभीर बनली आहे. मात्र असे असताना दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊनचा भडका उडाला आहे. सोमवारी रात्री निगडीच्या ओटास्की परिसरात एका गुंडाचा खून झाला होता. या खूनाचा बदला घेण्यासाठी 24 तासच्या आत प्रतिस्पर्धी गॅंगने आरोपीच्या मित्रावर खुनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

या हल्ल्यामध्ये भरत दिलीप लोंढे हा गंभीर जखमी झाला आहे. या हल्याचा सगळा थरार सिसिटीव्हीत कैद झाला. सोमवारी ओटास्कीम परीसरामध्ये आकाश उर्फ मोन्या गजानन कांबळे याचा टोळक्याने खून केला होता. या खूनाचा बदला घेण्यासाठी काल रात्री कांबळेच्या मित्राने भारत लोंढेवर टोळक्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये लोंढे हा गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात एकूणच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. निगडी पोलिसांनी सोहल संतोष जाधव, गणेश धोत्रे, श्रवण कुर्हाडे आणि वैभव बाबरेसह इतरांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...