आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधनवार्ता:पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे माजी शहराध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (५९) यांचे मंगळवारी सकाळी बाणेरमधील खासगी रुग्णालयात निधन झाले. या मतदारसंघातून सलग तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले हाेते. नुकतेच पुण्यातील कसबा मतदारसंघातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय नेत्यांनी जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. जगताप तीन वर्षांपासून कर्करोगाने आजारी होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालवत गेली. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कुटुंबीयांनी उपचारासाठी त्यांना अमेरिकेत नेले होते. एप्रिल २०२२ मध्ये ते पुन्हा मायदेशी परतले. काही दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. नंतरच्या काळात त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाली. डॉक्टरांनी अगदी शर्थीचे प्रयत्न केले, पण अखेर सर्व उपाय संपले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

बातम्या आणखी आहेत...