आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:पिंपरी-चिंचवडचे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नगरसेवक आणि माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नगरसेवक आणि माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे आज सकाळी  कोरोनामुळे निधन झाले. 25 जूनपासून बिर्ला हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनासह त्यांना निमोनियाचीसुद्धा लागण झाली होती.

मागील दोन दिवसांपासून श्वास घेण्यास त्यांना त्रास होत होता. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते परंतु आज कोरोनामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. ही बातमी शहरात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दत्ता काका साने चिखली मोरेवस्ती प्रभागातून सलग तीन वेळेस राष्ट्रवादीचे नगरसेवक राहिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...