आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Pimpri Chinchwad: On Asking For A License, A Man Hit A Traffic Constable With A Bike, Dragged Him On The Road For A Long Distance; Got Arrested; News And Live Updates

पुण्यातील धक्कादायक घटना:लायसंस मागतिल्यामुळे ट्रॅफिक कॉन्स्टेबलला आधी दिली धडक, नंतर रस्त्यावरुन नेले ओढत

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंजवाडी परिवहन विभागाचे कॉन्स्टेबल शंकर इंगळे हे एका नाकाबंदीवर आपली ड्यूटी करत होते

कोरोना महामारीमुळे कित्येक शहरात कडक लॉकडाऊन असून ठिकठिकाणी नाकाबंदी सुरु आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातील पिपंरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये ट्रफिक कॉन्स्टेबलला एका व्यक्तीला थांबवणे चांगलेच महागात पडले आहे.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून यामध्ये एक ट्रॅफिक कर्मचारी दुचाकी गाडीला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दरम्यान, तो खाली पडतो आणि दुचाकीस्वार त्याला मोठ्या अंतरापर्यंत ओडत नेताना दिसतो. या जखमी ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्याचे नाव शंकर तुकाराम इंगळे (47) असून त्यावर सध्या पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेतला असून त्यांची ओळख पटली आहे. त्या आरोपीची नाव संजय एकनाथ शेगे (42) असून त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

अशी घडली घटना
पिपंरी ट्रॅफिक विभागाच्या माहितीनुसार, हिंजवाडी परिवहन विभागाचे कॉन्स्टेबल शंकर इंगळे हे एका नाकाबंदीवर आपली ड्यूटी करत होते. यादरम्यान, संजय शेगे वेगाने आपली दुचाकी गाडी घेऊन जात होता. कॉन्स्टेबल इंगळे यांनी त्याला थांबवले आणि त्याचा परवाना व इतर कागदपत्रे मागितले.

परंतु, परवाना व कागदपत्रे दाखविण्याऐवजी आरोपी शेगे यांनी इंगळेशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यासोबतच इंगळे यांना धक्का देत दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. ही सर्व घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...