आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे शहरात मागील काही दिवसांपासून कोयता गँगने धुमाकूळ घातल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी पुणे पोलिसांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ‘गुन्हेगाराला पकडा आणि बक्षीस मिळवा’ अशाप्रकारची अनोखी योजना सुरु केली आहे.
याबाबतचे आदेश पुणे पोलिसांचे पुर्व आणि पश्चिम विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त यांनी काढलेले आहे. गुन्हेगाराला पकडा आणि बक्षीस मिळवा या अनोख्या योजनेनुसार, फरार आरोपीस पकडल्यास दहा हजार रुपयांचे बक्षीस, पाहिजे असलेला आरोपी पकडल्यास पाच हजार रुपयांचे बक्षीस, गंभीर अशा मोक्कातील आरोपीस पकडले तर पाच हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
जाहीर केलीत अशाप्रकारची बक्षिस
महाधोकादायक व्यक्तीचे विघातक कृत्यांना आळा घालणाऱ्यांना पाच हजार रुपयांचे बक्षीस, शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला शस्त्र अधिनियम कलम 325 नुसार पकडल्यास दहा हजार रुपयांचे बक्षीस, शस्त्र अधिनियम कलम 425 नुसार कारवाई केल्यास तीन हजारांचे बक्षीस, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 नुसार कारवाई केल्यास दोन हजार रुपये बक्षीस, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 5657 नुसार कारवाई केल्यास एक हजार रुपयांचे बक्षीस अशाप्रकारे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना बक्षीस जाहीर करण्यात आली आहे.
गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न
पोलिसांनी या नवीन बक्षीस योजनामुळे गुन्हेगारीचा कितपत आळा बसेल याबाबत चर्चा आता पोलिस दलात रंगू लागली आहे. दुसऱ्या बाजूला पोलिसांनी अल्पवयीन मुलांमधली वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
सराईत गुन्हेगारांपर्यंत पोहोचले
जुलै 2022 पासून आतापर्यंत अल्पवयीन मुलांवर दाखल झालेल्या 62 गुन्ह्यांचा अभ्यास पोलिसांनी केला आहे.त्यानुसार मागील सात महिन्याच्या काळात 62 गुन्ह्यांपैकी 42 गुन्ह्यातील लिंक ही सराईत गुन्हेगारांपर्यंत पोहोचत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबतच्या 22 लिंक आत्तापर्यंत शोधून त्यावर कारवाई केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.