आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा निर्णय:केंद्राच्या योजना ग्रा. पं. स्तरावर राबवणार : प्रा. राम शिंदे यांनी दिली माहिती

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ ग्रामीण भागातील अधिकाधिक पात्र लाभार्थींना मिळावा, यासाठी या योजना ग्रामपंचायत स्तरावर राबवण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घेतला असल्याची माहिती भाजपचे आमदार आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी प्रा. राम शिंदे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सोमवारी दिली आहे. प्रा. शिंदे म्हणाले, पहिल्या टप्प्यात देशातील सात जिल्ह्यांमध्ये १५ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...