आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी - उद्योजक गौतम अदानी महाघोटाळ्याचा आरोप करीत याविरोधात व वाढत्या महागाईच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी एसबीआय बँकेसमोर, जिल्हाधिकारी कार्यालया शेजारी जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योगपती मित्र अदानी यांच्या संबंधातून अदानी समुहाला जास्तीत जास्त फायदा मिळवून दिला जात आहे. देश सध्या गंभीर आर्थिक संकटात असताना केंद्रातील भाजप सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाचे प्रकल्प अदानी समुहाला विकण्याचा सपाटा लावला आहे.
एलआयसी आणि एसबीआय या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमध्ये मध्यमवर्ग, नोकरदार, व सामान्य जनतेने गुंतवलेले कष्टाचे पैसे मोदी सरकारने जबरदस्तीने अदानी समुहात गुंतवायला लावले. अदानी समुहातील महाघोटाळा उघड झाल्याने आता सामान्यांचा हा पैसा बुडण्याची भिती निर्माण झाली आहे.मोदी सरकारच्या उद्योगपती धार्जिण्या धोरणांमुळे अदानीचा महाघोटाळा उघड झाला असून जनतेचा पैसा सुरक्षित रहावा व या महाघोटाळ्याचा पर्दाफाश व्हावा यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे असे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
भाजप महागाई आणि बेरोजगारी याबाबत कोणत्या उपाय योजना करत नसल्याने देशातील तरुण हतबल झाले आहे. केंद्र सरकार केवळ विविध योजना जाहीर करते परंतु त्याची अमलबजावणी करत नाही.
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी संजय बालगुडे, दत्ता बहिरट, अविनाश बागवे, सुनिल शिंदे, संगीता तिवारी, करणसिंग मकवाणी, छाया जाधव, संगीता क्षिरसागर, रमेश सोनकांबळे, सतिश पवार, मुन्नाभाई शेख, विनोद रणपिसे, अमिर चौधरी, सचिन सावंत, प्रमोद निनारिया, फैय्याज मोमीन, नितीन वायदंडे, खुशाल चव्हाण आदी सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.