आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम केले. सांस्कृतिक मूल्यांवर आधारित त्यांचे अभंग ऊर्जा देतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग ५ टप्प्यांत आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग ३ टप्प्यांत पूर्ण होणार आहे. ११ हजार कोटी खर्चून ३५० किमीपेक्षा अधिक चौपदरीकरणाचा मार्ग तयार होईल. या मार्गामुळे परिसरातील विकासालाही गती मिळेल. संत तुकाराम महाराज यांची शिळा केवळ शिळा नसून ती सर्वांसाठी प्रेरणा असल्याचे ते म्हणाले. ३५० किमी वारी मार्गावर ११ हजार कोटी करणार खर्चदरम्यान, मोदी यांचे देहूनंतर मुंबईतील राजभवनासह इतरही कार्यक्रम झाले. देहू येथील शिळा मंदिराचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी उपमख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देहू मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे योगेश देसाई, पंढरपूर देवस्थान उपाध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसरे ,मारुतीबाबा कुरेकर, आचार्य तुषार भोसले उपस्थित होते. या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, तुकाराम गाथेचे रक्षण करणाऱ्या सुदुंबरे येथील संत जगनाडे महाराज यांनाही मी नमन करतो. तुकाराम महाराज सांगत गरीब श्रीमंत असा भेदभाव मी मानत नाही ते मानाने म्हणजे मोठे पाप आहे. या शिळेवर संत तुकाराम महाराजांनी १३ दिवस तपस्या केली. त्यामुळे ही शिळा भक्ती आणि ज्ञानाची आधारशिला आहे. “सबका साथ ,सबका विश्वास’ महत्वपूर्ण आहे आणि सरकार त्याप्रमाणे काम करत आहे, असेही मोदी म्हणाले.
शिळा मंदिराच्या लोकार्पणाला राज्यातून वारकऱ्यांसह चिमुकल्यांची मोठी गर्दी
मराठीतून भाषणाला सुरुवात
मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. देहू हे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आहे. या पवित्र तीर्थभूमीवर मला येता आले, हे मी माझे भाग्य समजतो. ‘जेथे नांदे देव पांडुरंग, धन्य ते क्षेत्रवासी लोक’ अशा भावना व्यक्त केल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनात संत तुकाराम महाराज यांची महत्त्वाची भूमिका होती. स्वातंत्र्यवीर सावरकर कैदेत असताना तुकाराम महाराजांचे अभंग म्हणत. आजही हे अभंग आपल्याला ऊर्जा देतात.
नरेंद्र मोदी हे प्रधानसेवक
फडणवीस म्हणाले, तुकाराम महाराज यांनी दाखवलेल्या मार्गावर पंतप्रधान मोदी वाटचाल करत आहेत. ते प्रधानसेवक असून ‘सबका साथ, सबका विश्वास’ हा विश्वास त्यांनी सार्थ ठरवत कोरोनात उल्लेखनीय कार्य केले.
डॉ. बाबासाहेबांच्या जन्मस्थळाचा विकास
महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थळ, मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूर येथील दीक्षाभूमीचाही विकास करण्यात येईल, असेही ते म्हणाले. मंदिराच्या लोकार्पणप्रसंगी वारकऱ्यांसह चिमुकल्या तुकोबाने लक्ष वेधून घेतले.
अजितदादा पहले आप... नंतर वाद
फडणवीसांचे भाषण झाल्यानंतर लगेच मोदी यांचे भाषण झाले. आयोजकांनी मोदींचे नाव घेताच स्वत: पंतप्रधानांनी अजित पवारांकडे हात दाखवला. मात्र, पवारांनी भाषण केले नाही. पीएमओ प्रोटोकॉलनुसार कार्यक्रम झाल्याचे संस्थानचे नितीन मोरे म्हणाले.
मोदींसमोर टोचले ठाकरे सरकारचे कान
राज्यपाल म्हणाले, औरंगाबादला सात दिवस पाणीच येत नाही
सेनेची सत्ता असलेल्या औरंगाबादेत पाच ते सात दिवस पाणी येत नाही. हे काही योग्य नाही. राज्यातील ८० सिंचन योजना २० वर्षांपासून रखडल्या आहेत. काही योजनांचे ४० वर्षांपासून काम सुरू आहे. मात्र, मोदी है तो मुमकिन है. त्यामुळे त्यांनी या योजना पूर्ण कराव्यात, असे म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी पंतप्रधान मोदी यांच्यासमाेरच ठाकरे सरकारचे कान टोचले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.