आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात गुन्हेगारच्या घटनांमध्ये वाढ:पीएमपीएल चालकाला बेदम मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाहतूककोंडी झाल्यामुळे रस्त्यात पीएमपीएल बस बंद करून थांबलेल्या चालकाने मोटारीला जागा न दिल्याच्या रागातून एकाच कुटूंबातील चौघांनी चालकाला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. ही घटना 2 सप्टेंबरला रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास शंंकरशेठ रस्ता परिसरातील सेव्हन लव्हज चौकात घडली.

याप्रकरणी निखील राजेश कटके (वय 26), कविता राजेश कटके (वय 44) , नितीन जयपाल कटके (वय 47 सर्व रा. श्रीकृष्ण सोसायटी गुलटेकडी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पीएमपीएल चालक लक्ष्मण धुमाळ (वय 41 रा. कात्रज) यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी लक्ष्मण हे पीएमपीएल बसचे चालक असून 2 सप्टेंबरला बस घेउन शंकरशेठ रस्त्याने निघाले होते. सेव्हन लव्हज चौकात वाहतूककोंडी असल्याने त्यांनी बस बंद केली. त्यावेळी मोटारीतून आलेल्या कटके कुटूंबियाने लक्ष्मण यांना शिवीगाळ केली. आज तुझ्या गाडीची काच फोडतो, असे म्हणत चौघांनी त्यांना बेदम मारहाण केली. पीएमपीएल बस चालकाने वाहनचालकाला रस्ता न दिल्याच्या रागातून संबंधित कुटूंबियाने बसचालकाला बेदम मारहाण केली

किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी

शिवाजीनगरमधील पाटील इस्टेट परिसरातील घटना

भांडणाच्या रागातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना 2 सप्टेंबरला रात्री अकराच्या सुमारास शिवाजीनगरमधील पाटील इस्टेट परिससरात घडली. याप्रकरणी दोन्ही गटाविरूद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तौसिफ उर्पâ अमन दस्तगीर शेख (वय 22), अल्ताफ मोहमंद शेख (वय 20 दोघेही रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे पाच ते सहा साथीदार फरार आहेत. विकास सावंत, विकी लोखंडे आणि अजय लोखंडे अशी जखमींची नावे आहेत. उमेश सावंत (वय ३२) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

उमेश आणि त्यांचे भाउ विकास हे 2 सप्टेंबरला रात्री अकराच्या सुमारास मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तेथे आलेल्या टोळक्याने भांडणाच्या रागातून विकास, विकी आणि अजय यांच्यावर शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले. त्याशिवाय अजय यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. धारधार शस्त्रे हवेत फिरवून हम जेल काट कर आये है, हमारा कोई बाल बाका नही कर सकता, अशी धमकी देउन परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहन साळवी तपास करीत आहेत.

दुसऱ्या तक्रारीनुसार मोटारीचा धक्का लागल्याच्या रागातून टोळक्याने तरूणावर वार करून गंभीररित्या जखमी केले. आदिल (पूर्ण नाव नाही ) असे जखमीचे नाव आहे. ही घटना २ सप्टेंबरला रात्री अकराच्या सुमारास पाटील इस्टेट परिसरात घडली. याप्रकरणी उमेश सावंत, विकी लोखंडे, आकाश लोखंडे, विकास लोखंडे, राहूल लोखंडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहन साळवी तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...