आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येत्या 16 डिसेंबर रोजी हाेणार अलॉटमेंट:पीएनजीएज गार्गीच्या आयपीओला 215 पटींपेक्षा मिळाला अधिक प्रतिसाद

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीएनजीएज गार्गी फॅशन ज्वेलरी लिमिटेडच्या बीएसई एसएमई कॅटेगिरीअंतर्गत असणाऱ्या प्राथमिक समभाग विक्रीस (आयपीओ) २१५ पटींपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. १३ डिसेंबर रोजी आयपीओच्या अखेरच्या दिवशी सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.

आयपीओमार्फत कंपनीने २६ लाख शेअर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले होते. त्याबदल्यात ५६.९० कोटी शेअरना मागणी आली. आयपीओसाठी एका शेअरचे विक्री मूल्य ३० रुपये होते आणि किमान चार हजार शेअरच्या एका लॉटसाठी अर्ज करायचा होता. आयपीओतून ७.८० कोटी रुपयांचे भांवडल उभे करण्याची कंपनीची योजना असून, कंपनीला आयपीओसाठी आलेली बोली ही सुमारे सतराशे कोटी रुपयांहून अधिकची आहे. १६ डिसेंबर रोजी आयपीओ अलॉटमेंट होणार असून, २१ डिसेंबर वा त्यापूर्वी शेअरची नोंदणी बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर होणार आहे.

महाराष्ट्रातून एसएमईअंतर्गत फॅशन ज्वेलरी सेक्टरमधून आयपीओला मान्यता मिळालेली पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी ही पहिलीच कंपनी आहे. आयपीओतून उभारली जाणारी रक्कम अतिरिक्त भांडवल, अन्य व्यावसायिक हेतू आणि विविध प्रकारच्या खर्चांसाठी वापरली जाणार आहे, असे कंपनीचे संचालक अमित मोडक यांनी सांगितले. फॅशन ज्वेलरी व्यवसायाची सुरुवात भारतातील जुना अन् प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड असलेल्या पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे प्रवर्तक अजित गाडगीळ व डॉ. रेणू गाडगीळ यांनी २०२१ मध्ये केली.

बातम्या आणखी आहेत...