आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभरात जाळे:दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून 560 दिव्यांगांना पाच कोटींचा गंडा, फसवणूक करणाऱ्या सहा मूकबधिरांना पोलिसांकडून अटक

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ दोन महिन्यांत गुंतवणुकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून विविध राज्यभरातील दिव्यांगांना ५ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात ५७० पेक्षा अधिक मूकबधिर, अंध, कर्णबधिरांची फसवणूक करण्यात आल्याचे पाेलिस तपासात उघडकीस आले असून याप्रकरणी सहा आराेपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात जादा रक्कम मिळालेल्या मूकबधिर साक्षीदारांनी पुणे न्यायालयात डिमांड ड्राफ्टद्वारे १२ लाख २७ हजार रुपयांची रक्कम जमा केल्याची माहिती सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या पाेलिस उपआयुक्त भाग्यश्री नवटक्के यांनी दिली आहे. या प्रकरणात सुयाेग मेहता, चंचल सुयाेग मेहता (दाेघे रा.धायरी,पुणे), अभिजर सैखउद्दीन घाेडनदीवाला (रा. साळुंखे विहार, पुणे), प्रदीप महारुद्र काेलते (रा.चिंचवड,पुणे), मिहिर संताेष गाेखले (रा.सदाशिव पेठ,पुणे), धनंजय सुदामराव जगताप (रा.कात्रज,पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी हर्षल पिंजण, (रा.देहुराेड,पुणे) यांनी शिवाजीनगर ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. याप्रकरणी पाेलिसांनी डिसेंबर २०२१ मध्ये सहा मूकबधिर आराेपींना अटक केली. या आराेपींनी सूयाे अँड अभि एंटरप्रायजेस व प्लॅटिनियम इनव्हेस्टमेंट अँड फायनान्स ग्लाेबल साेल्युशन या नावाच्या कंपन्या स्थापन केल्या.

या कंपन्याच्या बँक खात्यात तसेच स्वत:च्या बँक खात्यात वेगवेगळ्या राज्यांतील मूकबधिर व अंध लाेकांना ६० दिवसांत पैसे दुप्पट करून देताे असे आमिष दाखवून काेट्यवधी रुपये जमा केले. त्यातील काही रक्कम त्यांनी फाॅरेक्स ट्रेडिंगसाठी वापरून काही रक्कम वैयक्तिक खर्चासाठी वापरली व काही रक्कम सुरुवातीला गुंतवणूक केलेल्या मूकबधिर लाेकांना दुप्पट परतावा देण्यासाठी वापरली. त्यात सुरुवातीला बऱ्याच मूकबधिर गुंतवणूकदारांना व मित्र, नातेवाइकांना आराेपींनी जास्तीची रक्कम दिल्याचे बँक स्टेटमेंटवरून निष्पन्न झाल्याचे या वेळी सांगण्यात आले.

न्यायालयात १२ लाख २७ हजार रुपये जमा
याबाबत आर्थिक गुन्हे शाखा पाेलिसांनी केलेल्या तपासात संबंधित मूकबधिर साक्षीदारांनी रक्कम डिमांड ड्राफ्टद्वारे परत जमा केली आहे. आतापर्यंत १२ लाख २७ हजार रुपये अशा प्रकारे जमा झाले असून ज्या गुंतवणुकदारांना अशा प्रकारे जास्त रक्कम मिळाली त्यांनी पुणे न्यायालयाच्या खात्यात डिमांड ड्राफ्टद्वारे जमा करावी. यामुळे नुकसान झालेल्या मूकबधिर गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत मिळेल, असे आवाहन करण्यात आले आहे. जे गुंतवणूकदार त्यांना मिळालेली अतिरिक्त रक्कम जमा करणार नाहीत त्यांच्यावर याेग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पाेलिसांनी दिला आहे. त्यामुळे प्रकरणाची व्याप्ती वाढू शकते.

बातम्या आणखी आहेत...