आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील फॅशनस्ट्रीट गोळीबार प्रकरण:व्यापाऱ्यावर गोळीबार करणाऱ्याला पोलिसांकडून अटक; मंगळवारी रात्री घडली होती घटना

पुणे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यापारी संघटनेतील दोघांमध्ये असलेल्या जुन्या वादातून एकावर छर्‍याच्या बंदीकीतून गोळीबार करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली.ही घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गजबजलेला कॅम्पमध्ये फॅशनस्ट्रिट परिसरात घडली होती.

नईम उर्फ शानु सलीम शेख असे अटक केलेल्याची नावे आहेत. त्याचे साथीदार जुल्फिकार बशीर शेख आणि तरबेज कुरेशी फरार आहेत. गोळीबारात तौफिक अख्तर शेख जखमी झाला आहे.

तौफिक शेख आणि जुल्फीकार शेख हे व्यापारी संघटनेचे संबंधीत आहेत. त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. वादाचे पर्यवसन मोठ्या भांडणात झाले. मंगळवारी रात्री तौफिक शेख हा फॅशनस्ट्रिट परिसरातील एबीसी फार्म दुकानाजवळ आला असताना त्याचवेळी नइम व जुल्फीकार तेथे छर्‍यांची बंदुक घेऊन आले. त्यांनी तौफिक यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारात तौफिक जखमी झाला आहे. व्यापारी संघटनेतील वादातून फॅशनस्ट्रीट कायम वर्दळीच्या इमारतीत गोळीबार केल्याची घडल्याने खळबळ उडाली होती.

दरम्यान आरोपी नइम हा लुल्लानगर परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक विशाल मोहिते आणि उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, एपीआय विशाल मोहिते,उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, मोहसीन शेख, निखिल जाधव, शंकर नेवसे, प्रवीण कोकणे, विनोद चव्हाण, निखिल जाधव, उत्तम तारू, साधना ताम्हाणे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...