आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील धक्कादायक घटना:पुण्यात 14 वर्षांच्या मुलीवर 13 जणांचा सामूहिक अत्याचार; 8 अटकेत, 2 रेल्वे कर्मचारी, 8 रिक्षाचालक सहभागी

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वानवडी परिसरामध्ये रविवारी सायंकाळी ही घटना समोर आली.

माणसांना पशू म्हणावे तर त्यांचाही अवमान ठरेल, असे कृत्य पुण्यातील १३ जणांनी केले. माणसाच्या रूपातील १३ नराधमांनी १४ वर्षांच्या कोवळ्या मुलीवर सलग दोन दिवस सामूहिक अत्याचार केला. विशेष म्हणजे हे कृत्य करणाऱ्या १३ जणांची नावे समोर आली असून यात आणखी चार ते पाच जणांचा समावेश असण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. ही संतापजनक घटना पुणे शहरात घडली. मित्राला भेटण्यासाठी बिहारला जाण्यासाठी स्टेशनवर आलेल्या या मुलीने तिकिटासाठी पैसे नसल्याने काही लोकांकडे पैशांची मागणी केली आणि तिला मदत करण्याच्या बहाण्याने १३ नराधमांनी तिची अब्रू लुटली. शिवाजीनगर, पुणे स्टेशन व खडकी परिसरातील लॉज व अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीस चंदीगडहून शोधून आणल्यानंतर तिने आपबीती कथन केली.

दरम्यान, याप्रकरणी वानवडी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. त्यामध्ये रेल्वेचे दोन कर्मचारी, आठ रिक्षाचालक व इतर आरोपींचा सहभाग आहे. आतापर्यंत मशाक अब्दुलमजिद कान्याल (२७), अकबर उमर शेख (३२), रफिक मुर्तजा शेख (३२), अझरुद्दीन इस्लामुद्दीन अन्सारी (२७), प्रशांत सॅम्युअल गायकवाड (३२), राजकुमार रामनगीना प्रसाद (२९), मोईब नईम खान (२४), आसिफ फिरोज पठाण (३६) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मुळची बिहार येथील आहे. तिचे वडील वानवडी येथील एका व्यक्तीकडे माळीकाम करतात.

३१ ऑगस्ट रोजी मुलगी तिच्या बिहार येथील मित्राला भेटायला निघाली होती. कुटंुबीयांना माहिती न देताच ती स्टेशन परिसरात आली होती. मात्र तिच्याकडे तिकिटासाठी पैसे नव्हते. रात्री उशिरापर्यंत ती स्टेशन परिसरात फिरत होती. आरोपींची नजर तिच्यावर पडली. त्यांनी तिला येथे थांबण्याचे कारण विचारले असता, तिला बिहार येथे जायचे असून तिकिटासाठी पैसे नसल्याचे सांगितले. आरोपींनी तिला पैसे देण्याचे आमिष दाखवून रिक्षात बसवून नेले. त्यानंतर विविध ठिकाणी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी तिला दुसऱ्या नराधमांच्या ताब्यात दिले. त्यांनीही तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मुलगी रेल्वेने मुंबई आणि तेथून चंदिगडकडे गेली होती.

अशी फुटली घटनेला वाचा : रात्री मुलगी घरी आली नसल्याने तिच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. मात्र ती सापडली नाही. शेवटी १ सप्टेंबर रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासात पोलिसांना तिचे मोबाइलचे लोकेशन स्टेशन परिसरातील एका लॉजचे दिसले. पोलिसांनी तेथे जाऊन तपास केला असता तिच्यावर आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले. पोलिसांनी तपास करून रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांसह ९ जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर पीडिता मोबाइल चालू-बंद करत असल्याने लोकेशन मिळणे कठीण झाले होते. तांत्रिक विश्लेषणाद्वारे चंदीगडचा पत्ता मिळाल्यानंतर पंजाब पोलिसांच्या मदतीने तिला शोधण्यात यश मिळाले.

बातम्या आणखी आहेत...