आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंग्या आखाडे टोळीविरुद्ध मोक्का:मोक्का गुन्ह्यात वर्षभरापासून फरारी तिघांंना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोक्क्याच्या गुन्ह्यात मागील वर्षभरापासून फरार असलेल्या तिघाजणांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. रुग्णालयात उपचार घेण्यासाठी संबंधित संशयित आरोपी येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून एकाला ताब्यात घेतले. चौकशीअंती इतर दोघा साथीदारांनाही अटक करण्यात आली.

करण विठ्ठल काळे (वय 22), गणेश जयजयकार नाडे (वय 20, दोघेही रा. पद्मावती वसाहत, बिबवेवाडी, पुणे), चंदू गायकवाड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मोक्का गुन्ह्यातील फरारी आरोपींचा कोंढवा पोलिस शोध घेत होते.

त्यावेळी सराईत चंदू गायकवाड उपचार घेण्यासाठी रुग्णालयात येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार अमोल हिरवे, अभिजीत रत्नपारखी, गणेश चिंचकर मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दोघे साथीदार शेळके वस्ती परिसरात लपून राहत असल्याची माहिती दिली. त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली.

ही कामगिरी एसीपी पोर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक संजय मोगले, एपीआय अनिल सुरवसे, अमोल हिरवे, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, जयदेव भोसले, मरगळे, राहुल रासगे, दिपक जडे, महेश राठोड यांनी केली.

गंग्या आखाडे टोळीविरूद्ध मोक्का

वारजे माळवाडी परिसरात संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणारा सराईत गंग्या आखाडे टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कानुसार केलेली ही 108 वी कारवाई आहे.

टोळी प्रमुख गंग्या ऊर्फ विकी विष्णू आखाडे (वय 24, रा. वारजे माळवाडी) चैतन्य रुक्मीदास ढाले (वय 18, रा. पर्वती ) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या इतर फरार साथीदारांचा शोध सुरू आहे.

वारजे माळवाडी परिसरात सराईत गंग्या आखाडे याने साथीदारांच्या मदतीने खुनाचा प्रयत्न, दरोडा, मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, शस्त्र जवळ बाळगणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्याविरूद्ध वेळोवेळी कारवाई करूनही वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्यामुळे वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षव दगडू हाके यांनी टोळीविरूद्ध मोक्काचा प्रस्ताव उपायुक्त सुहेल शर्मा यांच्यावतीने अपर आयुक्त राजेंद्र डहाळे यांना सादर केला.

त्यानुसार टोळीविरूद्ध मोक्का कारवाई करण्यात आली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त सुहेल शर्मा, एसीपी रुक्मिणी गलंडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडु हाके, पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे, उपनिरीक्षक मनोज बागल, सचिन कुदळे, अमोल भिसे, नितीन कातुर्डे, गोविंद कपाटे, प्रियांका कोल्हे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...