आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप-प्रत्यारोप:आमदार पडळकर यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होणे समजू शकते. परंतु भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने शरद पवार यांची बदनामी करीत असून त्यांचे वारंवार प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अतिशय गंभीर बाब असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. याबाबत पडळकर यांच्या विरोधात विश्राम बाग पोलिस ठाणे आणि पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून गुरुवारी निवेदन सादर केले.

याबाबत शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, गोपीचंद पडळकर हे सातत्याने खोटी आणि बिनबुडाची माहिती पसरवित आहेत. नुकतेच त्यांनी एका प्रतिक्रिया देताना “राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेचा भगवा मफलर टाकून घोषणा देतात.” ‘उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करणारी ‘पवारांची माणसं होती’अशी बेजबाबदार आणि खोटी विधाने केली. त्यांचे हे विधान अतिशय गंभीर असून आमच्या सामाजिक व राजकीय संस्कृतीला धक्का पोहोचविणारे आहे. आम्ही या विधानाचा जाहिर निषेध करीत असून त्यांनी आमचा पक्ष व सर्वोच्च नेत्याच्या विरोधात खोटी माहिती पसरवून आमची बदनामी केली.

बातम्या आणखी आहेत...