आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच घेताना पोलिसाला रंगेहाथ अटक:ट्रॅक्टर सोडण्यासाठी 20 हजारांची लाच घेताना पोलिस हवालदार पुण्यात अटकेत

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिगवन ठाण्यातील पोलिस हवालदाराने जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २० हजार रुपये लाच स्वीकारताना एसीबीने सापळा रचून पोलिसाला रंगेहाथ अटक केली. रामदास लक्ष्मण जाधव असे पोलिसाचे नाव आहे. यातील तक्रारदार यांच्या शेताच्या वादावरून भिगवण पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला ट्रॅक्टर सोडवण्यासाठी पोलिस हवालदार रामदास जाधव याने २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र, तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार लाच घेताना त्याला अटक करण्यात आली.

दोन हजारांची लाच स्वीकारताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात: मृत आईचे सात बारावरील नाव कमी करण्यासाठी २ हजारांची लाच घेताना महिला तलाठ्याला एसीबीने रंगेहाथ अटक केली. पुरंदर तालुक्यातील चांबळी गावच्या तलाठी नीलम देशमुख असे तलाठी महिलेचे नाव आहे. तर नारायण शेंडकर याने देशमुख हिला मदत केली.