आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात पोलिस मुख्यालयात गोळीबार:ड्युटीवर असताना महिलेचा विनयभंग, कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडून केला आत्महत्येचा प्रयत्न

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवाजीनगर पोलिस ठाण्यानुसार, हवालदार बेंदळे कर्मचाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात जखमी झाले

पुणे पोलिसांच्या शिवाजीनगर मुख्यालयात विनयभंगाच्या घटनेतून गोळीबाराचा प्रकार घडला. ही घटना मंगळवारी पहाटे घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात विनयभंग आणि आत्महत्येचा प्रयत्न व आर्म अॅक्टनुसार दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. आरोपी असलेल्या पोलिस शिपायास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत गार्ड ड्यूटीवर असलेला पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे.

मयूर सस्ते (३३) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे, तर भेंडाळे हा पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. याप्रकरणी भेंडाळे आणि तीस वर्षीय महिला पोलिस कर्मचाऱ्याने तक्रार दिली आहे. पोलिसांनुसार, पोलिस मुख्यालयात एक तीस वर्षीय पोलिस कर्मचारी रात्री गेटवर ड्यूटीवर होती. आरोपी मयूर सस्ते हाही रात्रपाळीच्या ड्यूटीवर होता. साडेचारच्या सुमारास त्याने तक्रारदार महिलेचा विनयभंग केला. यामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरडा केला. घाबरलेल्या सस्तेने रायफल हिसकावत आत्महत्येचा प्रयत्न केला.

बातम्या आणखी आहेत...