आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायलेन्सर चोरांचा पर्दाफाश:गाड्यांचे सायलेन्सर चोरुन धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे ते अहमदनगर महामार्ग लगतच्या गावातील मारुती सुझुकी इको गाड्यांचे सायलेन्सर चोरुन धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. हि कारवाई शनिवारी (ता. 4) संध्याकाळी रांजणगाव येथे करण्यात आली.

पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये पुणे-अहमदनगर हायवे लगतच्या गावातील मारुती सुझुकी कंपनीच्या इको कारचे सायलेन्सर चोरीचे प्रमाण वाढले होते. अशा चोऱ्या करणाऱ्या टोळीना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.

फुटेजवरून लावला कयास

सायलेन्सर चोरीचे घडलेल्या गुन्ह्यांचा घटनाक्रम लक्षात घेत, प्रथम चोरी शिरूर परिसरातून सुरू होऊन कोरेगाव भीमा परिसरात शेवटची चोरी झाली होती. परिसरातील सीसीटीव्ही तपासून चोरटे हे अहमदनगर जिल्ह्यातील असण्याची दाट शक्यता वाढली. त्या अनुषंगानेच तपास पथकाने तपास करत असताना पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ गावातील शाहनुर मुनेर शेख याचे गॅरेज असून तो त्याचे साथीदारांसह सायलेन्सर चोरीचे गुन्हे करत असल्याची अशी माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी शोध सुरु केला यादरम्यान शोध चालू असतानाच संशयित आरोपी होंडा शाईन मोटार सायकलवर शिरूर बायपास रोडने पुणे बाजूकडे जात असल्याची माहितीही पोलिसांना समजली. त्यानंतर पोलिसांनी पथकाने सापळा रचून यापुर्वीच ताब्यात घेतले.

प्रथम त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सायलेन्सर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याचे साथीदार समीर रशीद सय्यद व आकाश संजय भंडलकर (दोघे रा राळेगण थेरपाळ ता पारनेर जि अहमदनगर) यांचे मदतीने गुन्हे केल्याची कबुली दिली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्यातील अन्य आरोपींचा शोध घेत होते.

गुन्ह्यातील अन्य आरोपी आकाश संजय भंडलकर (रा. मलठण ता. शिरूर जि पुणे) हा रांजणगाव परिसरात असलेबाबत माहिती मिळाल्याने पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याने अन्य साथीदार यांचे मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींकडून 10 गुन्हे उघडकीस आले आहे.

हि कामगिरी ही पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पो. निरीक्षक अशोक शेळके, सहा पोलिस निरीक्षक सचिन काळे, सहा. फौज. तुषार पंदारे, पो. हवा. जनार्दन शेळके, पो.हवा. राजू मोमीन, पो.ना. मंगेश थिगळे, पो.ना. योगेश नागरगोजे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...