आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच प्रकरण:पोलिस निरीक्षक, एपीआयने घेतली दीड लाखाची लाच, गुन्हा दाखल न करण्यासाठी पैशांची मागणी, पीआय पसार

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅस एजन्सीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक यांनी दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून खासगी व्यक्तीमार्फत दीड लाखाची लाच घेतल्याप्रकरणी एसीबीने गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस उपनिरीक्षकास ताब्यात घेतले असून पोलिस निरीक्षक पसार झाला आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक प्रवीण बाळासाहेब मोरे (५०), सहायक पोलिस उपनिरीक्षक कुतुबुद्दीन गुलाब खान (५२) आणि यासीन कासम शेख (५८), एएसआय खान आणि यासीन शेख यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केलेल्या ३९ वर्षीय तक्रारदाराची गॅस एजन्सी आहे. त्यावर कारवाई न करण्यासाठी एएसआय खान याने तक्रारदाराकडे २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती दीड लाख रुपये घेण्याचे ठरले. लाच घेण्यास पोलिस निरीक्षक मोरे यांनी एएसआय यांना प्रोत्साहन दिले. तक्रारदाराने पुणे एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर लाच घेताना दोघांना अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...