आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात मानाच्या 2 गणपतींचे विसर्जन:पोलिसांचे नियोजन फसले; पथकांच्या संख्येमुळे विसर्जन मिरवणूक लांबणार

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील गणेशोत्सवात विर्सजन मिरवणुक ही राज्यभरातील महत्वपूर्ण गणेशोत्सव मिरवणुक समजली जाते. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील मंडई परिसरातून मानाच्या पाच गणपतींची मिरवणुक सुरुवात झाली. बेलबाग चौक मार्ग सदर मिरवणुक लक्ष्मी रस्त्याने अलका टॉकीजच्या दिशेने जात डेक्कन येथे लकडी पुलाजवळील नदीपात्रातील घाटावर गणपतींचे विर्सजन करण्यात येत आहे.

मानाचा पहिला कसबा गणपतीचे विर्सजन शुक्रवारी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास झाले त्यानंतर मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विर्सजन संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पार पडले आहे.

दोन वर्षांनंतर भाविकांमध्ये उत्साह

गणेश मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात ढोल ताशा पथके, बँड पथके, जनजागृतीचे रथ, कला सादर करणारी पथके समाविष्ट झाल्याने मिरवणुकीचा वेळ वाढत असल्याचे दिसून येत आहे.पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचे निर्बंध गणेश मंडळांना अथवा ढोल ताशा पथकांना नसल्याने मनसोक्त पध्दतीने मिरवणुक सुरु असल्याचे चित्र मुख्य मिरवणुक मार्गावर दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटामुळे 2 वर्षाच्या विश्रांतीनंतर यंदा प्रथमच धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यास राज्यसरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे अभूतपूर्व गर्दी पुण्यातील गणेशोत्सवाच्या विर्सजन मिरवणुकीत दिसून येत आहे. पुण्यासह राज्यभरातील आणि देशातील विविध भागातील भाविक मोठ्या प्रमाणात मिरवणुकीत सहभागी झाले आहे. याशिवाय विशेष बाब म्हणजे परदेशी नागरिकांची मोठ्या प्रमाणात संख्या पारंपारिक भारतीय वेशभूषेत दिसून येत आहे. यासोबतच मानाचा पहिला कसबा गणपतीच्या मिरवणुकीत कलावंत पथक सहभागी झाले. यात अभिनेता सिध्दार्थ जाधव, अभिनेत्री श्रृती मराठे, अभिनेत्री तेजस्वीनी पंडित, अभिनेत्री पल्लवी पाटील,अभिनेत्री अनिता दाते-केळकर,अभिनेता कश्यप परुळकर सहभागी झाले होते.

पोलिसांचे नियोजन फसले

पुण्यातील गणेश विर्सजन मिरवणुकीचा बंदोबस्त सांभाळणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. अशावेळी अनुभवी,गणेश मंडळांशी समन्वय असणारे पोलिस अधिकारी प्रत्यक्ष विर्सजन मिरवणुकीवर असणे महत्वपूर्ण समजले जाते. मात्र, यंदाच्या विर्सजन मिरवणुकीत पोलिसांचे नियोजन फसल्याचे पदोपदी जाणवत आहे. मिरवणुक सुरू होणाऱ्या मार्गावरील प्रमुख बेलबाग चौकात गर्दी वाढूनही ढोल ताशा पथके पुढे हलविणारी यंत्रणा दिसून आली नाही. मनमानी पध्दतीने वादनात वेळ वाया घालवणाऱ्यांवर कारवाई होतांना दिसून आली नाही.टिळक चौकात कुठेही बॅरिकेटिंग नाही की दोऱ्या बांधण्यात आलेल्या नसल्याने नागरिक कुठेही शिरत आहे. दरम्यान, मिरवणुकीच्या पथकातील सदस्यांना मनस्ताप देखील झाला.

बातम्या आणखी आहेत...