आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारवाई:राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंच्या घरावर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचा छापा, तीन महागड्या गाड्या आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त

पुणे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवाजीराव भोसले यांनी सहकारी बँकेत केलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे छापे टाकण्यात आले

पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अनिल भोसले यांच्या घरावर पाेलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. यात त्यांच्या तीन महागड्या गाड्या आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. भाेसले यांनी खरेदी केलेल्या आणखी १० ते १२ कार पाेलिसांच्या रडारवर आहेत. शिवाजीराव भोसले यांनी सहकारी बँकेत केलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे छापे टाकण्यात आले आहेत. या गुन्ह्यात त्यांना अटकही करण्यात आली होती.

शिवाजीराव भाेसले सहकारी बँकेतील घोटाळ्यासंदर्भात भोसलेंवर कायदेशीर कारवाई झाली आहे. त्यांच्यावर तब्बल ७२ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या अपहारप्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत. सहकार कायद्यातील तरतुदींनुसार नुकसानीस जबाबदार असलेल्यांची संपत्ती जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. या प्रकरणात आणखी काही जणांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. या बँकेचे रिझर्व्ह बँकेने २०१८-१९ चे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यात ७१ कोटी ७८ लाख रुपये कमी आढळले होते. त्यानंतर या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात आली होती. आमदार अनिल भाेसले (वय-५५) , संचालक सूर्याजी जाधव (६९), मुख्य अधिकारी तानाजी पडवळ (५०), मुख्य हिशेब तपासणीस शैलेश भाेसले (४७) यांच्यावर याप्रकरणी यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत याेगेश लकडे यांनी पाेलिसांकडे फिर्याद दिली आहे. या प्रकरणात २१ मे राेजी पाेलिसांनी न्यायालयात महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) दाेषाराेपपत्र दाखल केले आहे. त्यानुसार ९३ हजार १२८ ठेवीदारांचे ४३२ काेटी रकमेतील ७१ काेटी ७८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. भाेसले यांचा यापूर्वी दाेन वेळा जामीन न्यायालयाने फेटाळलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...