आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील भारती विद्यापीठ पाेलिस ठाण्याचे हद्दीत आंबेगाव बुद्रुक येथील एका व्यक्तीच्या घरातून माेठया प्रमाणात गांजा विक्री करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विराेधी पथक एकला मिळाली हाेती. त्यानुसार पाेलिसांनी छापा टाकून अमित ऊर्फ बाॅब प्रभाकर कुमावत (वय 32) याला अटक केली आहे. त्याच्या घरातून पाेलिसांनी चार लाख 23 हजार रुपये किमतीचा 20 किलाे 940 ग्रॅम वजनाचा गांजा, इलेक्ट्राॅनिक वजन काटा, प्लास्टिक पिशव्या, गांजा पिण्याचे पेपर राेल बाॅक्स असा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सहाय्यक पाेलिस आयुक्त गजनान टाेम्पे यांनी दिली आहे.
अंमली पदार्थ विराेधी पथकातील पाेलिस नाईक विशाल शिंदे यांना आंबेगाव ब्रुदुक परिसरात सदाशिव दांगट नगर भागातील स्वस्तीक हाईटस इमारतीतील एका घरातून गांजा विक्री हाेत असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार त्यांनी सदर माहिती पाेलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांना सांगितल्यानंतर पाेलिसांनी तात्काळ कायदेशीर बाबींची पूर्तता करून अंमली पदार्थ विराेधी पथकातील कर्मचाऱ्यांसह संबंधीत ठिकाणी छापा टाकला. याप्रकरणी आराेपी अमित कुमावत विराेधात पाेलिसांनी भारती विद्यापीठ पाेलिस ठाण्यात एनडीपीसी अॅक्ट कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पाेलिस निरीक्षक विनायक गायकवाड, पाेलिस अंमलदार मारुती पारधी, मनाेजकुमार साळुंके, पांडुरंग पवार, विशाल दळवी, राहुल जाेशी, संदीप जाधव, प्रवीण उत्तेकर, विशाल शिंदे, संदेश काकडे, नितेश जाधव, याेगेश माेहिते, रेहाना शेख यांच्या पथकाने केली.
गांजा विक्री केल्याने दाेघे गजाआड
दुसऱ्या घटनेत अंमली पदार्थ विराेधी पथकाने पेट्राेलिंग दरम्यान सिंहगड राेड परिसरात जाधवनगर येथे हाॅटेल सिध्देश समाेर दाेन इसम सार्वजनिक रस्त्यावर संशयास्पद हालचाली करत असल्याने त्यांना जागीच पकडून त्यांच्याकडे नाव, पत्ता विचारणा केला. त्यांचे अंगझडती दरम्यान 31 हजार रुपये किमतीचा एक किलाे 554 ग्रॅम गांजा, 18 हजार रुपये किंमतीचे दाेन माेबाईल, 400 रुपये किंमतीचे दाेन काेयते असा एकूण 52 हजार 480 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सनी विजय भाेसले (वय-24,रा.सिंहगड राेड,पुणे, मु.रा.श्रीरामपुर, अहमदनगर) व साई गिता काेताकाेंडा (19,रा.सिंहगड राेड, पुणे, मु. रा. श्रीरामपूर, अहमदनगर) या दाेन आराेपींना अटक करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.