आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका गुन्ह्यात चोरीस गेलेली मारुती ईरटीगा कार सोडवण्यासाठी मोबदला म्हणून सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकाने 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 20 हजार रुपये लाच स्वीकारत असताना, त्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे, अशी माहिती एसीबी तर्फे गुरुवारी देण्यात आली आहे.
भ्रष्टाचाराचा गुन्हा
शशिकांत नारायण पवार असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या लाचखोर पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे 22 वर्षीय तरुणाने तक्रार दाखल केली आहे.
लाचेची मागणी
तक्रारदार यांच्या मालकीची मारुती ईरटीगा कार त्यांचा बदली चालक परस्पर कार घेऊन कर्नाटक येथे निघून गेला होता. हे वाहन परत मिळवून देण्यासाठी तक्रारदार यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. संबंधित कार परत मिळवून देण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून पोलिस उपनिरीक्षक शशिकांत पवार यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी ताकतदार यांच्याकडे केली.
पोलिस निरिक्षकास अटक
दरम्यान, तक्रारीची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केली असता, अभिरुची पोलिस चौकीत कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक शशिकांत पवार यांनी 20 हजार रुपयाची मागणी केली म्हणून त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एसीबीच्या पोलिस उपाधीक्षक विजयमाला पवार पुढील तपास करत आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे ,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव , सहायक पोलीस आयुक्त श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
संबंधित वृत्त
लाच घेताना पोलिसाला रंगेहाथ अटक:ट्रॅक्टर सोडण्यासाठी 20 हजारांची लाच घेताना पोलिस हवालदार पुण्यात अटकेत
भिगवन ठाण्यातील पोलिस हवालदाराने जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २० हजार रुपये लाच स्वीकारताना एसीबीने सापळा रचून पोलिसाला रंगेहाथ अटक केली. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.