आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:फाजील आत्मविश्वास असलेले दोन तरूण क्वारंटाईन, पैजा लावून पुण्यात जावून आलेल्या दोघांवर पोलिसांची कारवाई

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांना विचारणा केली असता बहिणीला पैसे देण्यासाठी जात असल्याचे कारण सांगितले

बार्शी तालुक्यातील नागोबाचीवाडी येथील दोन तरूणांनी मित्रांमध्ये बसल्यावर पैजा लावून पुणे येथे जावून आल्याची माहिती मिळाल्यानंतर बार्शी पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. जागोजागी पोलिसांची गस्त आणि खडा पहारा असतांनाही फाजील आत्मविश्वास असलेले अशा प्रवृत्तीचे तरूण काहीतरी वेगळे करण्याच्या नादात स्वत:सह इतरांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे. 

याबाबत ग्रामस्थांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, परदेशातील विषाणू व्हायरसमुळे महामारीची साथ सुरू झाली. त्याचे लोण देशात येवून कोरोनाचा रूग्ण संसर्गीत रूग्ण आढळल्यानंतर प्रशासनाकडून खबरदारीसाठी तात्काळ लॉकडाउनची घोषणा करण्यात आली व सर्व काही ठप्प झाले. विविध प्रसारमाध्यमातून त्याबाबत जनजाग्रती सुरू करण्यात आली, त्याची लहानमोठ्या गावात, वाड्या वस्त्यांवरही लोकजाग्रतीची चर्चा सुरू झाली. त्याचप्रमाणे रविवारी बार्शी तालुक्यातील नागोबाचीवाडी या गावातील काही तरूण मित्रांशी नेहमीप्रमाणे गप्पा मारत असतांनाच त्यापैकी दोन तरूणांनी फाजील आत्मविश्वास व्यक्त करून पैजा लावून पुणे जावून येवून दाखवतो असे सांगून ते आपल्या दुचाकीवर निघाले. दोघांनी पुणे येथील चाकण येथे जाण्यासाठी प्रवासही सुरू केला. त्यांना दुचाकीवरून जात असतांना जागोजागी वाहनांचे लायसन व कागदपत्रांची विचारणा करण्यात आली. ते जसजसे पुण्याला जात होते तसतसे मोबाईलवरून आपल्या मित्रांना आपण आता कुठे आहोत याची वेळोवेळी माहितीही दिली होती. मित्रांनी केलेल्या प्रतापाची वार्ता हळूहळू गावभर वाऱ्यासारखी पसरली आणि ग्रामस्थांमध्ये काळजीचे वातावारण निर्माण झाले. गावचे पुढारी आणि सामाजिक कार्यकर्त्या यांच्यापर्यंत सदरची वार्ता पोहोचल्याबरोबत त्यांनी तात्काळ दखल घेवून त्याची माहिती पोलिसांना कळविली. पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी तात्काळ यंत्रणा सतर्क केली व त्या दोघांच्या सोबत असलेल्या दुचाकीचे आणि मोबाईलचे क्रमांक प्रसारित केले. ते दोघेजण पुण्यात पोहोचले व चाकणकडे निघाले असतांना त्यांना पोलिसांनी तेथूनच परत हाकलून दिले, त्यानंतर त्यांनी गावाकडे परतीचा प्रवास सुरू केला. दरम्यान बार्शी पोलिसांनी त्यांचेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी मोबाईल उचलला नाही व नंतर बंद केला. पोलिसांनी सोमवारी त्यांच्या पध्दतीने त्यांचा तपास करून त्या दोघांना प्रवासादरम्यान दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली असून त्यांना गावातील शाळेच्या इमारतीमध्ये क्वारंटाईन करून ग्रामस्थांपासून अलिप्त केले आहे. त्या जागी त्यांना वेळोवेळी नाष्टा, जेवण इत्यादी अत्याआवश्यक सुविधा देण्यात येत आहेत. 

गावातील टवाळखोर पोरांमध्ये शर्यत लावली गेली, सध्या 155 प्रमाणे जिल्हाबंदी आदेश असतांनासुध्दा आम्ही नियम मोडूनसुध्दा पुण्यामध्ये जावून येवू शकतो असे म्हणून गावातील दोन तरूणांनी पैज लावली. त्यांनी चाकणला जावून व्हिडीओकॉल लावला आहे व कायद्याचे उल्लंघन केलेले असल्याची कबुली दिली व आम्ही ही बीट जिंकलेली आहे. पुण्यासारखे डेंजर झोनमधील असलेले ठिकाण असतांनाही त्या ठिकाणी जाणे याची या मुर्खांना लाजही वाटत नाही.  अशा प्रकारे चुकीचे काम झाल्याची माहिती मिळताच पोलिसांना खबर दिली. पोलिसांकडून तात्काळ योग्य ती पावले उचलली गेली असल्याने त्यांना ग्रामस्थांपासून अलग करता आले आहे. आम्ही जाग्रत नागरिक म्हणून असा प्रयत्न केला आहे. सध्याच्या संकटावेळी पोलिस प्रशासन, वैद्यकिय यंत्रणा ही आपल्याला वाचविण्यासाठी रात्रंदिवस रस्त्यावर उभे राहूनही काम करत आहेत. आपणही जाग्रत राहून आपले कोणतेही नातेवाईक आपल्याकडे येणार नाहीत व आपणही त्यांच्याकडे जाणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे.  - संजीवनी बारंगुळे, ग्रामस्थ व जिल्हाध्यक्षा, प्रहार संघटना.

पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे म्हटले की, दोन तरूण यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी संपर्क क्रमांक बंद केला, नाकाबंदीच्या कर्मचाऱ्यांना शेंदरीफाटा येथे आढळल्यानंतर त्यांची वैद्यकिय तपासणी करून पुढील उपाययोजना करण्यात आली आहे. सदरच्या प्रकाराबाबत गुन्हा नोंद करण्यात आला असून ते शर्यत लावून गेले होते का याबाबतची माहिती घेण्याचे पुढील तपास सुरू आहे.                    आम्ही दोघे पुणे येथे आमच्या दुचाकीवर गेलो होतो, आम्हाला गाडीचे कागदपत्र, लायसन याबाबत विचारणा करण्यात आली होती. आम्ही चाकण येथील बहिणीला पैसे देण्याच्या कामासाठी गेलो होतो. परंतु चाकणजवळच पोलिसांनी अडविल्यानंतर आम्ही तेथून परत निघालो. असे क्वारंटाईन असलेला तरूणाने सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...