आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:जाती-जातीत भेद निर्माण करणारे राजकारणी शिवशाहिरांचा अपप्रचार करतात : राज ठाकरे

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चंद्रकांत पाटील यांना क्लिप दिल्या नाहीत

ज्यांना जातीला धरून मतदान पाहिजे त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे लिखाण विशिष्ट विचारधारेशी निगडित असल्याचे सांगत दिशाभूल करणारी टीका सातत्याने केली. काेणत्याही गाेष्टींचे वाचन करायचे नाही. केवळ ऐकीव गाेष्टींवर टिप्पणी करायची. जातीजातीत भेद निर्माण करून आपल्या पाेटापाण्याचा भाग साधता येईल असा प्रयत्न किरकाेळ माणसे करतात, असा टाेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी लावला आहे.

ठाकरे म्हणाले, शिवचरित्र अनेकांनी आतापर्यंत लिहिलेले आहे. परंतु त्या शिवचरित्रातून समाजाने कसे राहिले पाहिजे, वागले पाहिजे, बाेध घेतला पाहिजे या गाेष्टी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून विलक्षणरीत्या ऐकण्यास मिळालेल्या आहेत. आजच्या जगात महाराज आपल्याला काय सांगत आहेत ही अनाेखी गाेष्ट मला बाबासाहेबांकडून अनुभवयास मिळाली आहे.

बाबासाहेबांची शिवचरित्रातील भाषा अलंकारिक आहे, परंतु ती अतिरंजित नाही. दंतकथांचा कधी शिरकाव त्यांनी शिवचरित्रात करून दिला नाही. जे ऐतिहासिक पुरावे मिळाले त्यानुसारच संदर्भ देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांचे शरीर थकले असले तरी चेहऱ्यावरील तेज, स्मरणशक्ती पूर्वीप्रमाणेच असल्याचे ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांना क्लिप दिल्या नाहीत
भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मनसेने परप्रांतीयांबाबत भूमिका बदलली तर निवडणुकीत त्यांच्याशी युती हाेऊ शकते. याबाबत ठाकरेंच्या क्लिपची तपासणी करून निर्णय घेण्यात येईल, असे भाष्य केले हाेते. याबाबत ठाकरे म्हणाले, चंद्रकांत पाटील यांना मी काेणत्याही क्लिप दिल्या नाहीत. त्यांना कुणी माझ्या भाषणाच्या क्लिप दिल्या असतील तर त्याबाबत मला माहीत नाही, असेही म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...