आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Pooja Chavan Sanjay Rathod Case | Big Relief For Shiv Sena MLA Sanjay Rathod As Pooja Chavan Parents Denies Any Suspicions In Daughters Death Latest News And Updates

संजय राठोड यांना दिलासा:पूजाचे आई-वडील म्हणाले- आम्हाला मुलीच्या मृत्यूबाबत कुणावरही संशय नाही, पुणे पोलिसांत नोंदवला जबाब

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभर गाजलेल्या पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यू प्रकरणात शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यू संदर्भात आपल्याला कुठलाही संशय नाही असा जबाब तिच्या पालकांनी नोंदवला. पूजाच्या आई-वडिलांनी पुणे पोलिसांत आपला जबाब नोंदवल्याची माहिती आता समोर आली आहे.

पुण्यातील वनवडी भागात पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येसाठी विरोधकांनी थेट शिवसेना आमदार संजय राठोड यांना जबाबदार धरले. याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता मात्र, पूजाच्या आई-वडिलांनी तिच्या मृत्यूबाबत कुणावरही संशय नाही असे स्पष्ट केले. पुण्यातील पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या आई-वडिलांनी आपला जबाब नोंदवला आहे. तरीही पोलिस यासंदर्भात सविस्तर तपास करत आहेत.

पुण्यात केली होती आत्महत्या
टिक-टॉक स्टार राहिलेली पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारी रोजी पुण्यातील वनवडी परिसरात एका फ्लॅटच्या गॅलरीवरून उडी घेत आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणाला महाविकास आघाडीतील तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्याशी जोडण्यात आले. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी राठोड यांचे नाव घेऊन आरोप केले. त्यांच्या कथित फोन संभाषणाच्या ध्वनीफीत देखील जारी केल्या. वाढत्या दबावामुळे राठोड यांना राजीनामा द्यावा लागला.

पुन्हा मंत्रिपद मिळणार?
संजय राठोड यांना या प्रकरणात क्लीनचिट अद्याप मिळाली नसली तरीही त्यांच्यासाठी हा जबाब मोठा दिलासा देणारा ठरेल. ज्या आरोपांमुळे संजय राठोड यांना आपले मंत्रिपद गमवावे लागले. त्यात आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना पुन्हा मंत्रिपद देण्याचा विचारही केला जाऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...