आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूजा चव्हाण प्रकरण:सबळ पुरावे आढळल्यास राठोड यांची चौकशी शक्य, माजी पाेलिस महासंचालक मीरा बाेरवणकर यांचे मत

पुणे / मंगेश फल्ले2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने पुण्यात आत्महत्या केल्याची घटना सात फेब्रुवारी राेजी घडली. त्यानंतर या प्रकरणात वनमंत्री संजय राठाेड यांचे नाव समाेर आले. याप्रकरणी माजी सनदी अधिकारी मीरा बाेरवणकर यांच्याशी केलेली बातचीत..

प्रश्न : पूजा चव्हाण प्रकरणात तिच्या कुटुंबीयांनी अद्याप लेखी तक्रार केलेली नाही. पाेलिसांनी कशा प्रकारे तपास करणे अपेक्षित आहे?
बाेरवणकर : पाेलिसांनी सीआरपीसी १७४ नुसार अकस्मात मृत्यूची नाेंद केलेली आहे. चाैकशीदरम्यान यामागे काेणते गुन्हेगारी कृत्य आहे हे निदर्शनास आल्यास संशयितांवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. यात नेमका काेण तपास करते आणि चाैकशी नंतर काय निष्पन्न हाेते, या बाबी महत्त्वपूर्ण आहेत.

प्रश्न : या प्रकरणात आॅडिआे क्लिपचा तपास कशा प्रकारे हाेऊ शकताे आणि पुरावा म्हणून त्याचे कितपत महत्त्व न्यायालयात आहे?
बाेरवणकर : तपास अधिकारी यांना सदर आॅडिआे क्लिप हस्तांतरित करून सत्यतेबाबत तपासणी करण्यास सांगितले जाऊ शकते. फॉरेन्सिक तज्ज्ञ यांनी सदर क्लिपची तपासणी करून त्यातील आवाजाची पडताळणी केल्यास ताे महत्त्वपूर्ण पुरावा ठरू शकताे.

प्रश्न : पाेलिस स्वत:चा अधिकार वापरून (सुमाेटाे) कारवाई करू शकतात का?
बाेरवणकर : सीआरपीसी १७४ नुसार पाेलिस स्व अधिकारात तपास करू शकतात. पूजा चव्हाण प्रकरणात केले जाणारे आराेप सत्य असतील, तर पूजा चव्हाणचे मित्र, कुटुंबीय यांनी सबळ पुरावे घेऊन तक्रारीकरिता समाेर आल्यास सक्षमपणे तपास हाेऊ शकताे.

प्रश्न :पाेलिस शकतात? चाैकशीसाठी मंत्र्यांना बोलावता येते का?
बाेरवणकर : या प्रकरणात मंत्र्यांचा सहभाग असल्याचे सबळ पुरावे आणि आॅडिआे क्लिप संदर्भात फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष मंत्र्यांना पाेलिस चाैकशीसाठी बाेलावू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...