आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण:घटनेआधी पूजा चव्हाण मद्यधुंद अवस्थेमध्ये होती, पुणे पोलिसांचा दावा

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी तपासात पुजाच्या घरात आढळल्या बाटल्या

मूळ परळीची असलेल्या पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीचा पुण्यात रविवारी घराच्या बाल्कनीमधून पडून मृत्यू झाला होता. या तरुणीचे काही कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले होते. त्यावरून पूजाने एका मंत्र्याच्या दबावातून आत्महत्या केली असल्याचा आरोप भाजप नेते करत आहेत. याप्रकरणी बाळगलेले मौन अखेर पुणे पोलिसांनी सोडले आहे. पूजा प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान, घटनेपूर्वी पूजाने मद्यप्राशन केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ऑडिओ क्लिप्स हा गुन्हा नोंद करण्याचा आधार होऊ शकत नाही तसेच तिच्या कुटुंबीयांनी तक्रार द्यायलाही नकार दिला असल्याने याप्रकरणी तांत्रिक अडचणींमुळे गुन्हा नोंद करता येत नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पूजा बाल्कनीतून खाली पडली त्या वेळी तिच्यासोबत तिचा चुलत भाऊ व एक मित्र असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पूजा राहत असलेले घर भाड्याने घेतले होते. ती इंग्लिश स्पोकनचा क्लास करण्यासाठी पुण्यात आली होती. ८ दिवसांपासून ती या घरात राहत होती. तपासादरम्यान घरात मद्याच्या बाटल्या होत्या. त्यातल्या अडीच बाटल्या रिकाम्या होत्या. यावरून तिने प्रचंड प्रमाणात मद्यप्राशन केले होते हेदेखील स्पष्ट झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

विदर्भातील नेतृत्वाला संपवण्याचा डाव, बैठकीत सूर

गेल्या काही दिवसांपासून पुणे येथे घडलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नको त्या बाबी पुढे करत एका नेत्याची बदनामी करण्याचा प्रकार सुरू आहे. इतकेच नव्हे तर या प्रकरणात कुठलेही ठोस पुरावे नसताना विदर्भातील बहुजन नेतृत्वाला संपवण्यासाठी षड््यंत्र आखून राजकीय खेळी खेळली जात आहे, असा सूर शनिवारी यवतमाळमध्ये पार पडलेल्या एका समाजाच्या बैठकीत निघाला.

बातम्या आणखी आहेत...