आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे परिसरात भूकंप:पुणे परिसरात जाणवले 2.6 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के, कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यातील कोयना परिसरात 27 जून 2017 रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते

पुणे शहरात मंगळवारी संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 2.6 मोजली गेली. यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्त हानी झाली नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी संध्याकाळी 7:28 वाजता भूकंपाच्या धक्क्याने पुण्यातील पुरंदर परिसर हादरला.

सन 2017 मध्येही आला होता भूकंप

याआधी 2017 मध्ये पुण्यातील कोयना परिसरात 3 जून 2017 रोजी रात्री 11.44 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.8 मोजली गेली होती. येथील कोयना धरण भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगितले जाते.

लडाखमध्येही भूकंप

याआधी मंगळवारी दुपारी 12 वाजून 48 मिनिटांनी लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजीच्या मते, रिक्टर स्केलवरील त्याची तीव्रता 3.6 मोजली गेली आहे.

जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही

दोन्ही भूकंपामध्ये कोणत्याही प्रकारच्या जीवित किंवा वित्त हानीचे नुकसान झाल्याची माहिती नाही. लडाखमध्ये नेहमीच भूकंपाचे धक्के जाणवतात. याआधी गेल्या वर्षी 19 ऑक्टोबर रोजी 3.6 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते.

बातम्या आणखी आहेत...