आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Practitioners Should Focus On A Single System Of Astrology Inauguration Of 40th All India Astrology Convention In Pune, Attendance From Across The Country

अभ्यासकांनी एकाच ज्योतिष पध्दतीवर लक्ष केंद्रीत करावे:पुण्यात राष्ट्रीय ज्योतिष अधिवेशनाचे उद्घाटन, देशभरातून उपस्थिती

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष हे गहन शास्त्र आहे. एका ज्योतिष पध्दतीनुसार काढलेला निष्कर्ष दुसऱ्या पध्दतीत बदलू शकतो. सर्व पध्दतींचा अभ्यास केला तरी, एकाच ज्योतिष पध्दतीवर लक्ष केंद्रीत करावे. ज्योतिष अभ्यासकांनी ज्योतिषशास्त्राची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी कार्यरत राहावे असे मत ज्योतिषाचार्य आदिनाथ साळवे यांनी शनिवारी व्यक्त केले.

भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आणि प्रा.रमणलाल शहा ज्योतिष अकॅडमी आयोजित 40 व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी पुण्यात झाले. उद्यान प्रसाद मंगल कार्यालय येथे हे दोन दिवसीय अधिवेशन सुरू आहे. 20 संस्थांचा या अधिवेशनाच्या आयोजनात सहभाग असून देशभरातून नामवंत ज्योतिर्विद या अधिवेशनात सहभागी झाले आहेत.

यांचा समावेश

अष्टकवर्ग ज्योतिष ( प्रदीप पंडित ), ग्रह ज्योतिष ( एस आंबेकर ), क्रिस्टलची अद्भुत दुनिया ( गौरी केंजळे ), अष्टक वर्ग अचूक फलादेशाचा मार्ग ( ज्योती जोशी ), बोटांचे ठसे व व्यक्तीमत्व (अ‍ॅड. प्रफुल्ल कुलकर्णी ), मंत्रशास्त्र या पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. या अधिवेशनात ज्योतिष विषयक विषयांवर देशभरातील तज्ज्ञांची चर्चासत्रे, प्रदर्शन, स्पर्धा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

उद्योजक अप्पासाहेब नवले यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. आदिनाथ साळवी अध्यक्षस्थानी होते. पं.राजेश वशिष्ठ (चंदीगढ ),कैलास केंजळे ( पुणे ), उद्योजक राजकुमार राठोड, संयोजक नवीनकुमार शहा, स्वागताध्यक्ष डॉ. प्रसाद जोशी, विजय जकातदार, चंद्रकला जोशी, पुष्पलता शेवाळे, डॉ. जयश्री बेलसरे, डॉ. मधुसुदन घाणेकर उपस्थित होते. चंद्रकांत शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. वैशाली अत्रे, गौरी केंजळे यांनी सूत्रसंचालन केले.

सिध्दी मिळवू शकत नाही

उद्घाटन कार्यक्रमात बोलताना राजकुमार राठोड म्हणाले, विचार सकारात्मक ठेवले तर नशीब साथ देते. ज्योतिषांनी ज्योतिष सांगताना फार गंभीर चेहरा करू नये. ज्योतिषांनी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचे काम करावे. देवदेवतांची आपण साधना करू शकतो, पण कोणीही सिध्दी मिळवू शकत नाही, हे लक्षात घ्यावे.

रविवारी भरगच्च कार्यक्रम

रविवारी दुसऱ्या दिवशीच्या सत्रांचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता होणार आहे. डॉ. दत्तप्रसाद चव्हाण अध्यक्षस्थानी असतील. उद्घाटन ज्योतिष गुरु पं. कुंवर हे करतील. डॉ. जयश्री बेलसरे स्वागताध्यक्ष असणार आहेत. डॉ. वा.ल. मंजुळ, अ‍ॅड. डॉ. सुनीता पागे, उद्योजक बी.जी. पाचारणे, उद्योजक अप्पासाहेब नवले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...