आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप:कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी भिडेंना राष्ट्रवादी काँग्रेस, मंत्री जयंत पाटलांमुळेच क्लीन चिट, वंचित आघाडीचे  प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरेगाव भीमा प्रकरणाला नाट्यमयरीत्या कलाटणी मिळत आहे. या प्रकरणातून शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना क्लीन चिट मिळाली. ही गंभीर बाब असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच संभाजी भिडेंना क्लीन चिट मिळाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

आंबेडकर म्हणाले की, कोरेगाव भीमाप्रकरणी ज्या तपास अधिकाऱ्याने हे क्लीन चिट दिले आहे, त्याने सर्वोच्च न्यायालयाला दिलेले अ‍ॅफिडेव्हिट नीट वाचलेले दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयाला असे सांगण्यात आले आहे की, संभाजी भिडे आणि एकबोटे याप्रकरणी दोषी आहेत. त्यामुळे तपास अधिकाऱ्याने कुणाच्या तरी सांगण्यावरून भिडे यांना क्लीन चिट दिली. त्यामुळे तपास अधिकाऱ्यानेच त्यांना क्लीन चीट दिल्याने तो अधिकारीच संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. भिडे हे याप्रकरणी निर्दोष आहेत, या निकषावर तपास अधिकारी कसे आले, हे पाहणे गरजेचे आहे. न्यायालयाची याप्रकरणी कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण झाली नाही. प्रक्रियेवरही पुन्हा आक्षेप नोंदवला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...