आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोला:लग्नाचा अनुभव नसल्याने मोदींना लव्ह जिहादची माहिती नाही; 'द केरळ स्टोरी' चित्रपटावरून प्रकाश आंबेडकरांचा टोला

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी 'द केरळ स्टोरी' सारखे चित्रपट कधीच बघत नाही. पंतप्रधान मोदींना प्रेमविवाहाचा अनुभव नसल्याने लव्ह जिहादची माहिती नाही, असा टोला वंचित बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.

'द केरळ स्टोरी' या चित्रपटाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठिंबा दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रीया येत आहेत.दरम्यान, पुण्यात पिंपरी चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी द केरला स्टोरी सारखे चित्रपट कधीच बघत नाही. या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी राजकीय वाद निर्माण केला जात आहे. त्यासाठी हे राजकारण सुरू असून या चित्रपटातून घेण्यासारखे काही नसेल अशी प्रतिक्रीया प्रकाश आंबेडकर यांनी दिली. काही जण ठरवून लग्न करतात, तर काही जण प्रेमविवाह करतात. प्रेमविवाह करताना जात धर्म बघितला जात नाही. मात्र, पंतप्रधान मोदींना याचा अनुभव नसल्याने त्यांना लव्ह जिहादची माहिती नाही असा टोलाही प्रकाश आंबेडकरांना लगावला.

नक्की वाद काय?

कर्नाटकमधील एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशदवादी कट असलेल्या कथानकावर आधारित द केरला स्टोरी या चित्रपटाला पाठिंबा दिला होता. केरळ हे देशातले सुंदर राज्य आहे. केरळमधील लोक खूप परिश्रमी आणि प्रतिभावान आहेत. पण त्याच केरळमध्ये सुरू असणाऱ्या दहशदवादी कटाचा खुलासा या चित्रपटाने केला आहे.

बॉम्ब, बंदूक पिस्तूलाचा आवाल ऐकू येतो पण समाजाला आतून पोखरले जात असल्याचा आवाज येत नाही. कोर्टही आतंकवादाच्या स्वरूपाची चिंता व्यक्त करते पण आपल्या देशाचे दूर्भाग्य बघा. आपल्या समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या दहशदवादी प्रवृत्तीच्या मागे काँग्रेस उभी आहे. असे मोदी म्हणाले होते.