आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एमपीएससी निकाल:राज्यसेवा मुख्य परीक्षेत कराडचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम, अभ्यासासाठी नोकरी साेडली, राेज दहा तास अभ्यास

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उस्मानाबादचा रवींद्र शेळके मागासवर्गीय प्रवर्गातून सर्वप्रथम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कराडच्या (जि. सातारा) प्रसाद चौगुले याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. प्रसाद हा सर्वसाधारण वर्गातून पहिला, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील रवींद्र शेळके मागासवर्गीय प्रवर्गातून प्रथम आला आहे. अमरावती जिल्ह्यातील पर्वणी पाटील महिलांत प्रथम आली.

प्रसाद मेकॅनिकल इंजिनिअर असून त्याने दुसऱ्या प्रयत्नात हे यश प्राप्त केले. एमपीएससीतर्फे १३ ते १५ जुले २०१९ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत एकूण ४२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १७ फेब्रुवारीला ३ लाख ६०,९९० उमेदवारांनी पूर्वपरीक्षा दिली. 

मुख्य परीक्षेकरिता ६,८२५ उमेदवार पात्र ठरले होते. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी १,३२६ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले. अंतिम निकालातील उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करण्यास इच्छुक उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाइलमध्ये पाठवण्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.

अभ्यासासाठी नोकरी साेडली, राेज दहा तास अभ्यास

२०१७ ते २०१८ या कालावधीत एका कंपनीत नोकरी केली. मात्र, अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने नोकरी सोडली. त्यानंतर दिवसभर सुमारे दहा तास अभ्यास केला. पहिला प्रयत्न सहज अनुभव यावा म्हणून दिला. मात्र, दुसरा प्रयत्न हा पूर्ण ताकदीनिशी केला. मित्र व नातेवाइकांनी मदत केली. त्यामुळे राज्यात पहिले येता आले. - प्रसाद चौगुले, राज्यात प्रथम

बातम्या आणखी आहेत...