आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसाद लाड यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य भोवले:पुण्यातील तरुणावर अश्लिल पोस्ट करत बदनामी केल्याने गुन्हा दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पक्षाचे उपाध्यक्ष प्रसाद लाड व त्यांचे माताेश्री यांच्या संर्दभात फेसबुकवर आक्षेपार्ह टिका टिप्पणी केल्याने मयुर बाेराळे नावाच्या फेसबुक अकाऊंट धारकावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात भादवि कलम 500 आणि आयटी अ‍ॅक्ट 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.

सदरची घटना चार ते 20 डिसेंबर दरम्यान आम्ही काँग्रेसकर या फेसबुक खात्यावर घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी मनिषा राजाभाऊ कदम (वय-44,रा.पुणे) यांनी आराेपी विराेधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. आराेपी याने त्याचे आम्ही काँग्रेसकर या त्याचे फेसबुक खात्यावर महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष प्रसाद लाड व त्यांचे माताेश्री यांचे बद्दल ‘ब्रेकिंग न्यूज प्रसाद लाड यांचा जन्म अशी पोस्ट केली होती, अशा मजकुराची अश्लिल पाेस्ट करुन त्यांची बदनामी केल्याने सदर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एन शिंदे करत आहे.

अ‍ॅट्राेसिटीचा खाेटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत खंडी मागितल्याने गुन्हा दाखल

मुंढवा परिसरातील अमर बिल्डर्स या बांधकाम संस्थेच्या सर्व्हे क्रमांक 83 येथील मिळकत हायस्पाॅट प्राॅपर्टीजचे बांधकाम चालू असताना, सदर कालवधीत तीन ते चार इसम हे त्यांचे जवळील कारमध्ये येऊन त्यांनी बांधकाम व्यवसायिकास धमकविल्याचा प्रकार घडला आहे.

आराेपींनी व्यवसायिकाकडे वेळाेवेळी पैशाची मागणी करुन पैसे न दिल्याच्या रागातून आंदाेलन करुन अ‍ॅट्राेसिटीचा खाेटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत एक लाख 80 हजार रुपये येणे बाकी असल्याचा फलक लावून अवाजवी घाेषरा देऊन खंडणीची मागणी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आराेपी राजन नायर, त्याची पत्नी सगाई नायर (रा.मुंढवा,पुणे) व संविधानिक टेन प्राेटेक्शन फाेर्स या नावाने कार्यरत संस्थेतील दाेन अनाेळखी इसम यांचेवर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...