आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिला महाराष्ट्र केसरीसाठी झालेल्या लढतीत आज प्रतिष्ठेचा किताब प्रतिक्षा बागडी हीन पटकावला. तिने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. तिने कल्याणच्या वैष्णवी पाटील हिचा तिने अवघ्या एका मिनिटांतच पराभव केला. 4-3 अशी आघाडी घेत तिने हा विजय संपादन केला. विजयानंतर ''मला अत्यंत आनंद झाला'' अशी प्रतिक्रीयाल प्रतिक्षा बागडी हिने दिली आहे.
उपांत्यफेरीतही प्रतिक्षाचा दमदार विजय
उपांत्य फेरीत प्रतिक्षा आणि वैष्णवी पाटील यांनी दणदणीत विजय मिळवले होते. प्रतिक्षाने कोल्हापूरच्या अमृता पुजारीवर 9-2 असा दमदार विजय मिळवला होता. या लढतीत प्रतिक्षाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला होता आणि तिचा तिला फायदा झाला होता. प्रतिक्षाला यावेळी 2 गुण गमवावे लागले असले तरी तिने 9 गुणांनची दमदार कमाई केली होती.
सांगलीत गिरवत आहे धडे
प्रतिक्षा ही वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली येथे कुस्तीचे धडे गिरवत आहे.तिला घरातूनच कुस्तीचे बाळकडू मिळाले ते म्हणजे वडील रामदास बागडी हे जुन्या काळातील नामवंत मल्ल.ते सध्या सांगली पोलीस दलात कार्यरत आहेत. प्रतिक्षाची आजवरची कामगिरी बघितली तर तिने तब्बल 12 वेळा राज्य स्पर्धेत पदके मिळवली आहेत आणि 22 वेळा राष्ट्रीय पातळीवर सहभाग आहे.
महिला कुस्तीची मान उंचावली
महाराष्ट्राच्या महिला कुस्तीला उत्कृष्ट दर्जा मिळवून देण्याचे श्रेय खेळाडू म्हणून प्रतिक्षाला जाते.तिच्या यशानंतर बऱ्याच मुली कुस्तीत आल्या आणि पालकांचाही प्रतिसाद मुलीसाठी खूप महत्वाचा ठरत आहे.सध्या ती के.बी.पी.कॉलेज इस्लामपूर येथे पहिल्या वर्षात शिकत आहे.
कोण आहे वैष्णवी पाटील?
कल्याण-डोंबिवलीची वैष्णवी पाटील ही लढणार आहे.वैष्णवी ही मांगरुळ कल्याणची कुस्तीगीर.वडील दिलीप पाटील हे शेतकरी असून हॉटेल व्यावसायिक आहेत. घरात कुस्तीचा कोणताही वारसा नसताना त्यांनी कुस्तीच्या प्रेमापोटी आपल्या मुलीला कुस्तीमध्ये उतरवले.वस्ताद पंढरीनाथ ढोणे बापूंच्या मार्गदर्शनाखाली जय हनुमान तालीम संघ नांदवली येथे सरावाला सुरवात करत अनेक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.तिने वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आहे.राज्यस्तरीय स्पर्धेत आजवर तब्बल दहा पदके मिळवले आहेत.
कल्याण जवळील मांगरूळ गावची पैलवान वैष्णवी दिलीप पाटील सांगली येथील होणाऱ्या पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आज तिचा सांगली मधील महिला पैलवान प्रतीक्षा बागडी आणि कल्याणची वैष्णवी दिलीप पाटील यांच्यात आज संध्याकाळी अंतिम सामना झाला.
कल्याणची वैष्णवी पाटील जय बजरंग तालीम येथे पंढरीनाथ ढोणे, वसंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.लहानपणा पासूनच कुस्तीची आवड आणि आतापर्यंत सहा ते सात राज्य, राष्ट्रीय स्पर्धा गाजवणारी वैष्णवी पाटील महाराष्ट्र केसरीच्या पहिल्या स्पर्धेमध्ये पोचली आहे.वैष्णवी पाटीलचे वडील दिलीप पाटील आणि आई पुष्पा पाटील यांचेही घरामधून पहिल्यापासूनच कुस्तीचा ओढा होता.त्यामुळे वैष्णवीला आवड निर्माण झाली.
राज्य,राष्ट्रीय लेव्हल पर्यंत तसंच आंतरराष्ट्रीय लेव्हल पर्यंत त्यांनी बाळगलेला स्वप्न मला पूर्ण करायचा असून महाराष्ट्र केसरी ह्या स्पर्धेपर्यंतच मला न थांबता मला आंतरराष्ट्रीय आणि ऑलम्पिक पर्यंत मजल मारायचे आहे, असे वैष्णवीने सागितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.