आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात बाप्पाच्या निरोपाची तयारी:2969 सार्वजनिक व 2 लाख 22 हजार 977 घरगुती गणपतीचे विसर्जन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात जल्लोषात साजरा केला जातो. पुण्यात 1 ते 7 सप्टेंबर यादरम्यान एकूण 333 सार्वजनिक गणपतीचे आणि दोन लाख चार हजार 653 घरगुती गणपतीचे विसर्जन पार पडले आहे.

अनंत चतुर्थीला गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवशी एकूण 2969 सार्वजनिक गणपती व दोन लाख 22 हजार 977 घरगुती गणपतीचे विसर्जन होणार असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली आहे.

असा असेल बंदोबस्त

यावेळी विशेष शाखेचे पोलीस उपयुक्त ए राजा, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे ,वाहतूक विभागाचे पोलीस आयुक्त उपयुक्त राहुल श्रीरामे उपस्थित होते. गुप्ता म्हणाले, गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी चार अपर पोलीस आयुक्त, दहा पोलीस उपायुक्त, 21 सहाय्यक पोलीस आयुक्त, 55 पोलीस निरीक्षक, 379 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, चार हजार 579 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.

तसेच बाहेरील चार सहाय्यक पोलीस आयुक्त, दहा पोलीस निरीक्षक, 50 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 250 कर्मचारी, एसआरपीच्या दोन कंपन्या आणि 269 होमगार्ड असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान ज्येष्ठ नागरिक, महिला व बालके यांच्यावर गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याबाबत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचित करण्यात आले आहे.

प्रत्येक हालचालींवर ठेवणार लक्ष

काही संशयित व्यक्ती अगर वस्तू निदर्शनास आल्यास पोलीस नियंत्रण कक्ष येथे 112 क्रमांकावर संपर्क साधण्याबाबत सूचित केले आहे. विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले असून त्याद्वारे मिरवणुकीतील प्रत्येक हालचालींवर सीसीटीव्ही कंट्रोल रूम मधून नजर ठेवण्यात येणार आहे. आषाढ पालखी प्रमाणे पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची तात्काळ माहिती, वाहतूक बदल बाबतची माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी यादृष्टीने पोलिसांनी ट्विटर आणि सोशल मीडियावर मॅपिंग उपलब्ध करून दिले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गणेश उत्सव मिरवणुकीच्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता असल्याने गणेश मंडळे आणि भाविकांनी तशा प्रकारची तयारी ठेवावी असे पोलिसांनी सुचित केले आहे.

मेट्रो कामामुळे मिरवणूक रथांना अडथळा

पुणे शहरात मेट्रोचे काम चालू असल्याने विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने पोलीस आवश्यक ती खबरदारी घेत आहे. डेक्कन जवळ लकडी पुल या ठिकाणी मेट्रोचा पुल 18 फूट उंचीवर असल्याने विसर्जन मिरवणुकीतील 18 फूट पेक्षा कमी उंची असावी या उद्देशाने संबंधित पोलीस उपयुक्त यांनी गणेश मंडळांना त्यांच्या देखाव्यांची उंचीच्या मर्यादा बाबत मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे मंडळांना रथ उंची मर्यादित ठेवावी लागणार आहे. मात्र, यातून मार्ग काढण्यासाठी काही मंडळांनी हायड्रोलिक पद्धतीने उंची ऐनवेळी कमी करता येऊ शकेल असे रथ बनवले आहेत.

बातम्या आणखी आहेत...