आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:सोशल मीडिया ग्रुपमधून काढल्याने अध्यक्ष महिलेच्या पतीस मारहाण

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फुरसुंगी परिसरातील एका साेसायटीत राहणाऱ्या कुटुंबास साेसायटीच्या व्हाॅट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने त्या व्यक्तीने साथीदारांसह साेसायटीच्या अध्यक्ष असलेल्या महिलेच्या पतीस बेदम मारहाण करून जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत त्यांच्या जिभेला जखम झाली आहे. याप्रकरणी पाच जणांवर हडपसर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी मंगळवारी दिली आहे.

प्रीती किरण हरपळे (३८) यांनी याबाबत हडपसर पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार २८ डिसेंबर राेजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. त्यानुसार पाेलिसांनी सुरेश किसन पाेकळे, सुयाेग भरत शिंदे, अनिल म्हस्के, शिवराम पाटील, किसन पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फुरसुंगीत आेम हाइट्स सहकारी गृहनिर्माण संस्था साेसायटी आहे. तक्रारदार प्रीती हरपळे या साेसायटीच्या अध्यक्ष आहेत. तक्रारदार व आराेपी हे एकाच साेसायटीत रहाण्यास असून सुरेश पाेकळे यांनी हरपळे यांचे पती किरण हरपळे यांना व्हाॅट्सअपवरून ‘तुम्ही मला आेम हाइट्स आॅपरेशन’ या ग्रुपमधून रिमूव्ह का केले आहे?’ असा मेसेज केला. परंतु त्यास हरपळे यांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे पाेकळे यांनी हरपळे यांना फाेन करून मला तुम्हाला भेटायचे आहे, असे सांगत त्यांच्या आॅफिसमध्ये भेटण्यास गेले. या वेळी पाेकळे यांनी ‘तुम्ही मला ग्रुपमधून काढून का टाकले’ असे विचारल्याने किरण हरपळे यांनी ‘ग्रुपमध्ये काहीही मेसेज टाकत आहेत, त्यामुळे आम्ही ग्रुपच बंद केला आहे,’ असे सांगितले. त्यावर पाेकळे याने त्यांना शिवीगाळ करून त्यांच्या ताेंडावर ठाेसा मारून जखमी केले. इतर आराेपींनी हरपळेंच्या पतीचे पाय धरून त्यांना मारहाण करून जखमी केले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर हरपळे यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात सोसायट्यांमधील भांडणात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...