आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालेखक आणि वाचकांमधील दुवा असणारे प्रकाशक पुस्तकनिर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावरील वाढत्या महागाईने काळजीत पडले आहेत. ग्रंथनिर्मितीच्या प्रत्येक विभागाला १८% जीएसटी आहे, पण तयार पुस्तक मात्र ग्राहकाला देताना करमुक्त द्यावे लागते. त्यामुळे वाढीव खर्चाचा ताण अपरिहार्यपणे पुस्तकांच्या किमती वाढण्यावर होणार आहे. ही वाढ सुमारे ५०% असू शकते आणि येत्या सप्टेंबरपासून ती प्रत्यक्षात येणार आहे.
राज्यभरात हजारहून अधिक प्रकाशक आहेत. प्रकाशक संघाच्या सभासदांची संख्याच ४६५ आहे. प्रत्येक प्रकाशक वर्षाला सरासरी १० ते १२ पुस्तके छापतात. मात्र, एकीकडे ऑनलाइनमुळे मंदावलेली मागणी आणि दुसरीकडे कागदाच्या किमतीतील वाढ, जीएसटी यामुळे वाढलेला निर्मिती खर्च या कात्रीत प्रकाशन संस्था सापडल्या आहेत.
सव्वा रुपयाचे पान अडीच रुपयांना पुस्तकांच्या एका पानाचा खर्च सव्वा ते दीड रुपया येत होता. तो सध्या दोन ते सव्वादोन रुपये प्रतिपान असा वाढला आहे. यामागे कागदाच्या किमतीत झालेली वाढ आणि पेट्रोलच्या दरात झालेली वाढ ही दोन कारणे असल्याचे अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष व दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे यांनी “दिव्य मराठी’ला सांगितले. याशिवाय पुस्तकनिर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असणाऱ्या खर्चावर जीएसटी अनिवार्य आहे. पण छापील पुस्तक ग्राहकाला विकताना मात्र करमुक्तच विकावे लागते, असा तिढा आहे. त्यामुळे अपरिहार्यपणे छापील पुस्तकांच्या किमती दुपटीने वाढणार असल्याची माहिती प्रकाशकांनी दिली.
गेल्या चार वर्षांमधील पुस्तकनिर्मिती खर्चाचा वाढता आलेख असा...
शाई, केमिकल सोल्युशन्स तसेच बायंडिंगचे दर विविध कंपन्यांनुसार निरनिराळे आहेत. तरीही २०१८ च्या तुलनेत या सर्व खर्चामध्ये
40% वाढ झाली आहे.
प्लेटमेकिंग : ४ वर्षांपूर्वी २५० ते ३५०, आता ६००
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.