आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त, पंतप्रधान मोदी सीरम इन्स्टिट्यूटला एक तासाची भेट देणार

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळासह सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्लीतील सुरक्षा पथके पुण्यात दाखल झाली असून पंतप्रधानांच्या दौऱ्याकरिता सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या असून, एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) व स्थानिक पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. मोदी यांच्या सुरक्षेकरिता विशेष वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुणे विमानतळावरून पंतप्रधान हेलिकॉप्टरने सीरमकडे जाणार आहेत. त्यामुळे सुरक्षेची खबरदारी म्हणून राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेबरोबरच शहर पोलिसांनीदेखील कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात ठिकठिकाणी तपासणी सुरू करण्यात आली आहे.

राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांनी विमानतळ व सीरम इन्स्टिट्यूट येथे गुरुवारी पाहणी करत सुरक्षेबाबत संबंधितांना सूचना दिल्या. पंतप्रधान दाैऱ्याची शुक्रवारी रंगीत तालीमही घेण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, पंतप्रधान सीरम इन्स्टिट्यूटला एक तासाची भेट देणार असून, त्या दृष्टीने आवश्यक सर्व पोलिस बंदोबस्ताची शहर पोलिस दलाकडून तयारी करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी शहर पोलिस दलातील अतिवरिष्ठ अधिकारी, बॉम्बशोधक व नाशक पथक, एसआरपीएफच्या तुकड्या यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser