आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांचा मंगळवारी देहू दौरा:देहू परिसरास छावणीचे स्वरूप; 2 हजार पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार

पुणे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूतील तुकोबांच्या शिळा मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमिवर देहूत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी पोलिसांच्या छावण्या लागल्या आहे. येणा-या जाणा-यांवर चोख लक्ष ठेवण्यात येत आहे. मोदींच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. यासाठी 10 पोलिस उपायुक्त, 10 साहाय्यक पोलिस आयुक्त, 100 पोलिस निरीक्षक, 300 पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक असे एकूण 2 हजार पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्या पुण्यात आगमन होणार आहे. त्यांचे विमान लोहगाव विमानतळावर उतरणार आहे. यानंतर हेलिकॉप्टरने ते देहूत जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमिवर व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी देहू नगरी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षसाठी मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून फक्त व्हीआयपींनाच प्रवेश दिला जाणार आहे. इतर नागरिकांच्या वाहनांना काही वेळेसाठी प्रवेशबंदी असणार आहे. तसेच ज्या नागरिकांना सभास्थळी जायचं आहे त्यांच्यासाठी त्यांना लवकर निघावे लागणार आहे. सभास्थळी जाण्यासाठी तीन रस्ते ठेवण्यात आले आहेत. तळवडे, म्हाळुंगे आणि इंदोरी बाजूने या मार्गावरूनच नागरिक येऊ शकतात. पण, देहू गावात प्रवेश करण्यास मनाई आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यसाठी सभा स्थळी येण्यासाठी जवळपास 20 बस तैैनात करण्यात आल्या आहेत. ही बस परंडवाल चौकापर्यंत जाणार असून तेथून पुढे नागरिकांना सभा स्थळी पायीच जावे लागणार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली.

ड्रोन, बलून सफारी आदींसाठी मनाई

पुणे जिल्ह्यात कायदा व सुरक्षितता राखण्याच्यादृष्टीने पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ड्रोन, पॅराग्लायडींग, हॉट बलून सफारी, मायक्रोलाईट एअरोप्लेन अशा प्रकारची अवकाश उड्डाणे करण्यास मनाई आदेश लागू केले आहेत. सदर आदेश 14 जून रोजी 00.00 पासून 14 जून रोजी सायं. 6 वाजेपर्यंत लागू राहतील. आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...