आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Prisoner Assaulted While Going To Online Hearing In Yerawada Jail He Was Beaten With Hands And Stones And Injured, A Case Was Registered In The Police Station

येरवडा कारागृहात सुनावणीस जाताना कैद्यावर हल्ला:हाताने व दगडाने मारहाण करुन जखमी केले, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन सुनावणीस ऑनलाईन व्हिसीद्वारे उपस्थित राहण्याकरीता जात असलेल्या कैद्यांशी दाेन जणांनी 8 ऑगस्ट रोजी भांडणे करुन त्यास हाताने व दगडाने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी येरवडा पाेलीस ठाण्यात आरबाज बशीर शेख (वय 25) व सलमान बशीर शेख (28, दाेघे रा.येरवडा, पुणे) यांच्यावर याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.

याबाबत कैदी देवानंद ऊर्फ देवा भीमाशंकर जमादार (वय-25, रा.येरवडा, पुणे) याने आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे. देवानंद जमादार हा येरवडा मध्यवर्ती कारागृहात सर्कल क्रमांक दाेन मध्ये न्यायलयीन बंदी आहे. तर आराेपी अरबाज शेख व सलमान शेख हे रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून माेक्का मधील न्यायबंदी आराेपी आहे.

माेक्का केसमधील बंदी

तक्रारदार कैदी देवानंद जमादार हा येरवडा कारागृहात न्यायबंदी असताना त्याचा मित्र एन्सन पाॅल याने अरबाज शेख व सलमान शेख यांच्या विराेधात केस दाखल केली. त्यात संबंधित आराेपी माेक्का केस मध्ये न्यायालीन बंदी आहेत. 8 ऑगस्ट राेजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास येरवडा कारागृहातील व्ही.सी.काेर्ट गेटसमाेर देवानंद जमानदार याचे नाव व्ही.सी. काेर्टसाठी नाव पुकारले गेले.

हाताने व दगडाने मारहाण

त्यावेळी आरोपी व्हीसीसाठी जात असताना संबंधित आराेपी यांनी जमादार यास केस मागे घेण्यास सांगितले असता, त्यास जमादाराने तुमचे तुम्ही बघून घ्या असे बाेलला. या गाेष्टीचा राग मनात धरुन आराेपींनी त्यास हाताने व दगडाने मारहाण करुन जखमी केले आहे. याबाबत पुढील तपास येरवडा पाेलीस ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक अशोक काटे करत आहे.

कैदी जख्मी

याबाबत तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे म्हणाले, तक्रारदार देवानंद जमादार याच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात दरोडा, खंडणी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. तर आरोपी अरबाज शेख आणि सलमान शेख हे मोक्का गुन्ह्यातील आरोपी आहे. त्यांनी दगडाने मारहाण केल्याने तक्रारदार कैदी देवा जामदार याच्या डोक्यात जखम झाली असून त्याला सहा टाके पडले आहे. येरवडा रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले आहे. आरोपी शेख बंधू यांना अटक करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...