आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:पोलिस असल्याचे सांगून खंडणी मागणारा जेरबंद

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे कँटोनमेंटचे माजी नगरसेवक विवेक यादव यांच्यावर पूर्वी दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्या भावास एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर फोन करून ‘मी एसीपी कदम मुंबई येथून बोलतोय, असे भासवून त्यांच्याकडे पूर्वी दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी १५ ते २० लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन भामट्यास जेरबंद केलेे. अमित जगन्नाथ कांबळे (रा. नवी पेठ ,पुणे ) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी सापळा रचून ससून हॉस्पिटलच्या पाठीमागील राजीव गांधी रोड लगत हनुमान मंदिराजवळ आरोपी अमित कांबळे यास ताब्यात घेतले. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्यास लष्कर पोलीस स्टेशनच्या ताब्यात पुढील तपासासाठी देण्यात आले आहे. सदर आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने पोलिस,डॉक्टर असल्याची बतावणी अनेकांना गंडवले आहे.